Realme आपल्या बजेट कॅटेगरी मधील C सीरीज मध्ये यावर्षी अनेक नवीन फोन्स सादर करण्याचे प्लानिंग करत आहे. अलीकडेच Realme C21 नावाच्या फोन बद्दल माहिती समोर आली होती. सी-सीरीजचा अजून एक फोन Realme C20 बद्दल मोठा खुलासा झाला आहे. वियतनामच्या एका ऑनलाइन रिटेलरने रियलमी सी20 च्या लॉन्चच्या आधीच किंमत व स्पेसिफिकेशन्स सह लिस्टिंग केली आहे. इतकेच नव्हे तर लिस्टिंग वरून आगामी रियलमी फोनचे फोटोज समोर आले आहेत, त्यामुळे फोनची डिजाइन समजली आहे. कंपनीने ऑफिशियली फोन संबंधित कोणतीही माहिती दिली नाही.
डिजाइन
लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या फोटोजनुसार रियलमीच्या या हँडसेट मध्ये वाटरड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले दिला जाईल, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या डिस्प्ले वर तिन्ही बाजूनी खूप कमी बेजल्स आहेत तर बॉटमला बारीक चिन पार्ट मिळतो. तसेच मागे फोन मध्ये चौकोनी सिंगल कॅमेरा दिसत आहे. हँडसेट मध्ये उजवीकडे वाल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. याव्यतिरिक्त फोन Grey आणि Green कलर ऑप्शन मध्ये दिसत आहे.

आशा आहे कि फोन लवकरच भारतासह इतर आशियन बाजारांमध्ये लॉन्च होऊ शकतो. Realme C20 स्पेसिफिकेशन एका प्रमोशनल इमेजच्या माध्यमातून समोर आले आहेतवियतनामी रिटेलर FPT Shop ने रियलमी सी20 ची किंमत व स्पेसिफिकेशन्स संबंधित माहिती लीक केली आहे.
हे लीक सर्वप्रथम Playfuldroid ने सार्वजनिक केले. गेल्या महिन्यात हा फोन थायलंडच्या नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकम्युनिकेशंस कमीशन (NBTC) सर्टिफिकेशन वेबसाइट वर दिसला होता.
किंमत
रियलमी सी20 FPT Shop वर 2,690,000 VND (जवळपास 8, 600 रुपये) मध्ये लिस्ट केला गेला आहे. फोनचा फक्त 2 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज वेरियंट ऑनलाइन दिसला आहे.

स्पेसिफिकेशन्स
लिस्टिंगनुसार, Realme C20 मध्ये 6.5 इंचाचा HD + डिस्प्ले असेल, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल असेल. तसेच डिस्प्ले मध्ये 89 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि गोरिल्ला ग्लास 3 लेयर असेल. फोन मध्ये IMG PowerVR GE8320 GPU सह मीडियाटेक Helio G35 SoC असेल. हँडसेट मध्ये 2GB LPDDR4x रॅम आणि 32GB स्टोरेज दिली जाईल, जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
कॅमेरा डिपार्टमेंट पाहता Realme C20 मध्ये 8MP चा सिंगल सेंसर आणि एलईडी फ्लॅश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी समोर 5MP चा स्नॅपर देण्यात आला आहे. तसेच हँडसेट मध्ये 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट सह 5,000mAh ची बॅटरी आहे.

कनेक्टिविटी फिचर पाहता फोन मध्ये डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि एक माइक्रो-यूएसबी पोर्टचा समावेश आहे. हा Android 10 OS वर Realme UI कस्टम स्किन सह चालेल.














