OPPO F17 भारतात लॉन्च, बघा या फोनचे शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO ने भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ मध्ये दोन नवीन स्मार्टफोन OPPO F17 आणि OPPO F17 Pro लॉन्च केले आहेत. ओपो एफ17 प्रो ला कंपनीने साल 2020 चा सर्वात स्लीम फोन म्हटले आहे तसेच ओपो एफ17 पण शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला आहे. कंपनीने एफ17 प्रो एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे ज्याची किंमत 22,900 रुपये आहे. ओपो एफ17 प्रो ची विक्री येत्या 7 सप्टेंबर पासून सुरु होईल तर ओपोने एफ17 ची किंमत कंपनीने अजून सांगितलेली नाही. चला जाणून घेऊया आहे काय खास OPPO F17 मध्ये.

लुक व डिजाईन

OPPO F17 कंपनीने 2.5डी कर्व्ड डिजाईन वर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मधोमध ‘यू’ शेप वाली नॉच देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या बाजूला उजवीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे जो चौकोनी आकारात आहे. ओपो एफ17 Navy Blue, Classic Silver आणि Dynamic Orange कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

OPPO F17 कंपनीने 6.44 इंचाच्या फुलएचडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येते. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ओपो एफ17 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर OPPO F17 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेस, 2 मेगापिक्सलच्या मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या रेट्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO F17 कंपनीने दोन रॅम वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे ज्यात बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम तर मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम आहे. हे दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. ओपो एफ17 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो एफ17 स्मार्टफोन पण 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी असलेल्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here