ओटीटी सेक्टरमधील बडा प्लेयर Amazon Prime आपल्या युजर्सना खुश करू शकतो. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या सब्सस्क्रिप्शन मॉडेलमध्ये स्वस्त ‘प्राइम लाइट’ चा समावेश करू शकते. रिपोर्ट्सनुसार कंपनी भारतात प्राइम लाइटच्या स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅनची टेस्टिंग करत आहे. टेक ब्लॉग ओनलीटेकला एका निवडक बीटा टेस्टिंग प्रोग्राममधून याची माहिती मिळाली आहे आणि वेबसाइटनं प्लॅनचा स्क्रीनशॉट देखील शेयर केला आहे. त्यामुळे असं वाटत आहे की कंपनी देशात आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्न करत आहे.
Amazon Prime Lite price in India
OnlyTech च्या बातमीनुसार Amazon Prime Lite च्या अॅन्युअल प्लॅनची प्राइस 999 रुपये असू शकते. Amazon Prime च्या एक वर्षाच्या रेग्युलर सब्सक्रिप्शनची किंमत 1,499 रुपये आहे. विशेष म्हणजे वर्षभराच्या रेग्युलर प्लॅनची आधी किंमत 999 रुपयेच होती, परंतु कंपनीनं साल 2021 डिसेंबरमध्ये या प्लॅनच्या किंमतीत 50 टक्क्यांनी वाढ केली. हे देखील वाचा: बजेटमध्ये BGMI-PUBG साठी फोन हवा? 16 फेब्रुवारीला भारतात येतोय शानदार गेमिंग फोन iQOO Neo 7 5G
प्राइम लाइटची बीटा टेस्टिंग सुरु आहे आणि भारतात काही प्राइम मेंबर्ससाठी हा प्लॅन उपलब्ध आहे. तसेच, टेस्टिंग यशस्वी झाल्यास अॅमेझॉन हा किफायतशीर सब्सक्रिप्शन प्लॅन सर्व युजर्ससाठी जारी करू शकते. परंतु हे कधी होईल हे सांगणं जरा कठीणच आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे युजर्स स्मार्ट टीव्ही आणि कंप्यूटरवर देखील अॅमेझॉन प्राइम लाइट सर्व्हिस वापरू शकतील.
Amazon Prime Lite मध्ये मिळतील हे बेनिफिट्स
अॅमेझॉन प्राइम लाइटमध्ये अॅमेझॉन प्राइम मेंबर्सना दोन दिवसांत अनलिमिटेड फ्री आणि स्टॅंडर्ड डिलिव्हरी मिळू शकते. अर्थात यात सेम-डे डिलिव्हरी किंवा वन-डे डिलिव्हरीचा फायदा मिळणार नाही. तसेच मेंबर्सना प्राइम एक्सक्लूसिव्ह ऑफर्स आणि डील्सचा फायदा सर्वप्रथम मिळू शकतो.
ग्राहक अॅमेझॉन-पे ICICI बँक क्रेडिट कार्डनं शॉपिंग करून 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकतात. या प्लॅनमध्ये अॅडसह अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचा अॅक्सेस दिला जाऊ शकतो. तसेच प्राइम व्हिडीओचे रेजोल्यूशन SD ठेवलं जाऊ शकतं आणि एकावेळी फक्त 2 डिवाइसवर कंटेंट पाहता येऊ शकतो. या स्वस्त प्लॅनमध्ये युजर्स प्राइम म्यूजिक, प्राइम गेमिंग, फ्री ईबुक आणि नॉ-कॉस्ट EMI सारख्या बेनिफिट्सचा लाभ मिळणार नाही. हे देखील वाचा: Motorola च्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनची किंमत लीक; 512GB मेमरीसह होणार Edge 40 Pro ची एंट्री
Amazon Prime Yearly Plan
सध्या अॅमेझॉन प्राइमकडे एक Yearly plan आहे, ज्याच्या माध्यमातून ग्राहक टीव्ही आणि लॅपटॉपवर कंटेंट अॅक्सेस करू शकतात. या प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ई-कॉमर्स साइट कडून फास्ट आणि मोफत डिलिव्हरी, म्यूजिक आणि व्हिडीओ स्ट्रीमिंगचा लाभ मिळतो.
