Home बातम्या 12GB रॅम 1000GB स्टोरेज सह आला ASUS ROG Phone II Ultimate Edition, ऑक्टोबर मध्ये होईल सेल

12GB रॅम 1000GB स्टोरेज सह आला ASUS ROG Phone II Ultimate Edition, ऑक्टोबर मध्ये होईल सेल

बर्लिन मध्ये सुरु असलेल्या IFA 2019 मध्ये तैवानची कंपनी Asus ने आपला ASUS ROG Phone II Ultimate Edition सादर केला आहे. हा डिवाइस कंपनीने खाई महिन्यांपूर्वी सादर केलेल्या ROG Phone II गेमिंग स्मार्टफोनचा पावरफुल वर्जन आहे. नवीन ROG Phone II Ultimate Edition मध्ये कंपनीने 12जीबी रॅम + 1टीबी स्टोरेज दिली.

तसेच हँडसेट एक्सक्लूसिव मॅट ब्लॅक फिनिश आणि फास्टर लाइट परर्फोमेंस Cat 20 4G LTE सपोर्ट सह येतो जो 2Gbps डाउनलोड स्पीडला सपोर्ट करतो. इतर स्पेसिफिकेशन्स ASUS ROG Phone II प्रमाणे आहेत.

ASUS ROG Phone 2 Ultimate Edition मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.6-इंचाचा मोठा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्सल डेनसिटी 391पीपीआई आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. त्याचबरोबर ROG Phone 2 चा डिस्प्ले पॅनल 10बिट एचडीआर ला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 12GB रॅम 1000GB स्टोरेज सह आला ASUS ROG Phone II Ultimate Edition, ऑक्टोबर मध्ये होईल सेल

ASUS ROG Phone 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाइड-एंगल सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

ROG Phone 2 मध्ये पावर बॅकअप साठी ASUS द्वारा 6,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 30वॉट ROG HyperCharge ला सपोर्ट करते जी 3A केबलने चार्ज करता येईल. विशेष म्हणजे या फोनची बॅटरी क्विक चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीने पण चार्ज करता येईल.

हे देखील वाचा: शानदार फीचर्स सह आले Lenovo K10 Note आणि A6 Note स्मार्टफोन

किंमत

ROG Phone II Ultimate Edition ची किंमत €1,199 (जवळपास 95,000) रुपये आहे. हा हँडसेट ऑक्टोबर पासून सेल साठी येईल. चीन व्यतिरिक्त हा फोन या महिन्याच्या शेवटी यूरोपियन मार्केट मध्ये शिप केला जाईल.

आसूस आरओजी फोन 2 वीडियो