Lenovo ने आज भारतीय बाजारात आपले Lenovo Z6 Pro, Lenovo K10 Note आणि Lenovo A6 Note स्मार्टफोन सादर केले आहेत. लेनोवो झेड6 प्रो आधी चीनी मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे. तर लेनोवो के10 नोट आणि लेनोवो ए6 नोट नवीन डिवाइस आहेत. चला पुढे जाणून घेऊया या दोन्ही फोन्स बद्दल सर्वकाही.
Lenovo K10 Note चे स्पेसिफिकेशन्स
लेनोवोच्या या स्मार्टफोन मध्ये 6.3-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 19:5:9 आस्पेक्ट रेशियो, 90 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो सह येतो. यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी/6जीबी रॅम आणि 64जीबी/128जीबी स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत.
फोटोग्राफी साठी Lenovo K10 Note मध्ये तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. सेटअप पाहता यात 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे. 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा 2x ऑप्टिकल झूम सह येतो. तसेच तिसरा सेंसर सुपर बोके इफेक्ट सह येतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये डॉल्बी ऑडियो, रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोन मध्ये 4,040एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जरला सपोर्ट करते.
हे देखील वाचा: 8जीबी रॅम आणि 48-एमपी क्वॉड रियर कॅमेर्यासह भारतात लॉन्च झाला Lenovo Z6 Pro
Lenovo A6 Note चे स्पेसिफिकेशन्स
Lenovo A6 Note मध्ये 6.09-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 88 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येतो. डिस्प्ले K10 Note प्रमाणे वॉटर ड्रॉप नॉच सह येतो. यात कंपनीने मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसर दिला आहे. डिवाइस मध्ये फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.
लेनोवो के6 नोट मध्ये मागे फिंगरप्रिंट सेंसर आहे. त्याचबरोबर यात फेस अनलॉक सपोर्ट, डुअल सिम सपोर्ट आणि वेगळ्या माइक्रोएसडी कार्ड स्लॉट सह हा एक डुअल कॅमेरा फोन आहे. मागे दोन 13-मेगापिक्सलचे सेंसर आहेत. फ्रंट पॅनल फक्त एक 5-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी आहे जी 10 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत
Lenovo च्या नवीन नोट डिवाईसेजची किंमत पाहता Lenovo K10 Note चा 4जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हा स्मार्टफोन 16 सप्टेंबर पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा: Exclusive : Vivo V17 Pro चा खरा फोटो बघा सर्वात आधी इथे, डुअल पॉप-अप सह असेल क्वॉड रियर कॅमेरा
त्याचप्रमाणे Lenovo A6 Note कंपनीने 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे हा स्मार्टफोन 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Lenovo A6 Note देशात 11 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.