Categories: बातम्या

BSNL चा पैसा वसूल प्लॅन! 130 दिवस डेली Unlimited Data आणि फ्री कॉलिंग, जाणून घ्या सविस्तर

BSNL Recharge Plans: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) कडे एकापेक्षा एक दमदार प्रीपेड प्लॅन्स (BSNL Prepaid Plan) आहेत. त्याच प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) पैकी एक 699 रुपयांच्या आहे. जर तुम्ही देखील एखादा असा प्लॅन शोधत असाल, ज्यात तुम्हाला कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेटसह दीर्घ वॅलिडिटी हवी असेल तर BSNL च्या हा Recharge योग्य ठरेल. या शानदार प्लॅनमध्ये कंपनीनं 4 महिन्यांपेक्षा जास्त वैधता दिली आहे. पुढे आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनबाबत माहिती दिली आहे, ज्यात वॅलिडिटी एकूण 130 दिवसांची आहे.

बीएसएनएलचा 699 रुपयांचा प्लॅन

BSNL_Karnataka च्या ट्विटर हँडल @BSNL_KTK वर या प्लॅनची माहिती शेयर करण्यात आली आहे. परंतु हा काही नवीन प्लॅन नाही. हा प्लॅन कंपनीनं 1 एप्रिल 2021 रोजी एका प्रमोशनल एक्स्ट्रा वॅलिडिटी ऑफरसह सादर केला होता. आता या प्लॅनमध्ये मिळणारी वैधता पूर्वीच्या तुलनेत खूप कमी करण्यात आली आहे. परंतु तरी देखील Reliance Jio, Airtel आणि Vodafone idea च्या प्लॅनच्या तुलनेत हा रिचार्ज जास्त बेनिफिट्स देतो. चला जाणून घेऊया या खास रिचार्ज प्लॅनबाबत सविस्तर. हे देखील वाचा: शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

4 महिन्यांपर्यंत एन्जॉय करा प्लॅन

बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 699 रुपये आहे. जर तुम्ही या प्लॅननं फोनमध्ये रिचार्ज केल्यास, यात तुम्हाला एकूण 130 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. म्हणजे जवळपास 4 महीने तुम्ही कोणत्याची अडचणीविना प्लॅनमध्ये मिळणाऱ्या कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनिफिट्सचा फायदा घेऊ शकता. चार महिने वारंवार रिचार्ज करावा लागणार नाही.

65GB डेटाचा मिळेल लाभ

प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट वापरता येईल. परंतु, डेली डेटा लिमिट 0.5Gb असेल. डेली डेटा लिमिट संपल्यावर देखील युजर्स इंटरनेट वापरू शकतील, परंतु त्याचा स्पीड 80 kbps करण्यात येईल. प्लॅनमध्ये एकूण 65GB डेटा युजर्सना वापरण्यासाठी मिळेल. हे देखील वाचा: National Cinema Day 2022: 75 रुपयांमध्ये थिएटरमध्ये जाऊन बघा बॉईज 3; सीट्स संपण्याआधी बुक करा कोणताही चित्रपट

फ्री कॉलिंग आणि एसएमएस देखील मिळणार

कॉलिंग बेनिफिट्स पाहता बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. तसेच युजर्सना डेली 100 SMS ची सुविधा देखील मिळेल. त्यामुळे कमी किंमतीत बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन खूप चांगला आहे. ज्यांना मोबाइल डेटा कमी लागतो, परंतु कॉलिंग जास्त हवी आहे तसेच दीर्घकाळ वैधता हवी असेल तर बीएसएनलचा हा 699 रुपयांचा रिचार्ज प्लॅन त्यांच्यासाठी योग्य ठरू शकतो.

Note: हा प्लॅन बीएसएनएल कर्नाटक सर्कलसाठी आहेत. परंतु, जर तुम्ही दुसऱ्या राज्यातील बीएसएनएल युजर्स असाल तर कंपनीच्या साइट किंवा BSNL कस्टमर केयरवर कॉल करून चेक करू शकता की हा प्लॅन तुमच्या सर्कलमध्ये वैध आहे की नाही.

Published by
Siddhesh Jadhav