रेडमी-रियलमीलाही झेपलं नाही हे काम; 7,699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला अत्यंत स्वस्त स्मार्टफोन लाँच

itel Vision 3 Turbo India Launch Price Specifications Sale Offer

भारतीय ग्राहकांना स्वस्त स्मार्टफोन्स जास्त आवडतात, हे आयटेल ब्रँडनं ओळखलं आहे. म्हणून कंपनीचे बहुतांश स्मार्टफोन एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये सादर होत असतात. आयटेल आज पुन्हा भारतीय बाजारात आपला नवीन आणि बजेट फ्रेंडली मोबाइल फोन सादर केला आहे. हा नवीन स्मार्टफोन itel Vision 3 Turbo नावानं लाँच झाला आहे ज्याची प्राइस फक्त 7,699 रुपये आहे. या Cheap Mobile Phone मध्ये 6GB RAM पावर सोबतच 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी सारखे दमदार स्पेसिफिकेशन्स मिळतात.

itel Vision 3 Turbo Specifications

आयटेल व्हिजन 3 टर्बोचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो आयपीएस पॅनलवर बनला आहे. ही स्क्रीन 2.5डी ग्लासद्वारे प्रोटेक्टेड आहे. फोन डिस्प्ले 269पीपीआयवर चालतो तसेच यात कंपनीनं जी+एफ इनसेल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. हे देखील वाचा: ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

itel Vision 3 Turbo India Launch Price Specifications Sale Offer

itel Vision 3 Turbo अँड्रॉइड 11 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 3जीबी रॅमवर सादर झाला आहे ज्यात 3जीबी टर्बो रॅम टेक्नॉलॉजी मिळते. त्यामुले गरज पडल्यास हा आयटेल मोबाइल 6 जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. फोनमध्ये 64जीबी स्टोरेज आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी itel Vision 3 Turbo स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाइलच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक वीजीए लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

itel Vision 3 Turbo India Launch Price Specifications Sale Offer

itel Vision 3 Turbo ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक व ओटीजी सोबतच फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन रियर फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग व रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone; किंमत 7,499 पासून सुरु

itel Vision 3 Turbo Price

itel Vision 3 Turbo 7,699 रुपये प्राइसवर भारतात लाँच झाला आहे जो Multi Green, Jewel Blue आणि Deep Ocean Blue कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनी फोनसह free one-time screen replacement सर्व्हिस देखील देत आहे ज्यात फोन खरेदी केल्यानंतर 100 दिवसांपर्यंत मोफत डिस्प्ले बदलून घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here