शानदार सेल्फीसाठी 50MP कॅमेरा, मल्टीटास्किंगसाठी 16GB रॅम; Vivo चा नवीन 5G Smartphone लाँच

50MP Selfie Camera Phone Vivo X80 Lite Launched Know Price Specifications Details

Vivo आपल्या एक्स सीरिज अंतर्गत हाय एन्ड स्मार्टफोन लाँच करते, जे जबरदस्त कॅमेरा स्पेसिफिकेशन्ससाठी प्रसिद्ध आहेत. यंदा कंपनीनं या सीरिजमध्ये Vivo X80 आणि Vivo X80 Pro हे दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये सादर केले आहेत. परंतु आता या सीरीज अंतगर्त टेक ब्रँड विवोनं नवीन 5जी फोन Vivo X80 Lite लाँच केला आहे. हा विवो मोबाइल colour-changing rear panel, 64MP Rear, 50MP Selfie Camera, Dimensity 900 Chipset आणि 44W 4,400mAh Battery अशा जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. पुढे आम्ही विवोच्या एक्स सीरिजमधील नव्या आणि स्वस्त Vivo X80 Lite च्या फुल स्पेसिफिकेशन्स व किंमतीची माहिती दिली आहे.

Vivo X80 Lite Specifications

विवो एक्स80 लाइट 2404 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. या स्मार्टफोन स्क्रीनमध्ये 1300निट्स ब्राइटनेस, 100 कलर गामुट आणि एचडीआर10+ सारखे फीचर्स आहेत. हा विवो मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. हे देखील वाचा: National Cinema Day 2022: 75 रुपयांमध्ये थिएटरमध्ये जाऊन बघा बॉईज 3; सीट्स संपण्याआधी बुक करा कोणताही चित्रपट

50MP Selfie Camera Phone Vivo X80 Lite Launched Know Price Specifications Details

Vivo X80 Lite अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेट देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमवर लाँच झाला आहे ज्यात 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 8 जीबी अतिरिक्त रॅम मिळवता येतो त्यामुळे एकूण 16 जीबी रॅमची पावर मिळते.

फोटोग्राफीसाठी Vivo X80 Lite ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. अशाप्रकारे सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Amazon Great Indian Festival Sale: प्राइम मेंबर्ससाठी सेल सुरु; या स्मार्टफोन्सवर मिळतायत सर्वात बेस्ट डील

ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतात. फोनमध्ये एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 44 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. विशेष म्हणजे हा विवो मोबाइल लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे हेव्ही गेमिंगच्या वेळी देखील हा स्मार्टफोन थंड राहतो.

Vivo X80 Lite price

विवो एक्स80 लाइट सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे ज्यात 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची प्राइस भारतीय करंसीनुसार 35,500 रुपयांच्या आसपास आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा नवीन विवो 5जी फोन Sunrise Gold आणि Diamond Black कलरमध्ये विकत घेता येईल. लवकरच विवोच्या नव्या Vivo X80 Lite स्मार्टफोनची भारतात देखील एंट्री होऊ शकते, परंतु याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळेलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here