प्राइवेट टेलीकॉम ऑपरेटर्सना टक्कर देत सरकारी कंपनी बीएसएनएल अनेक दिवसांपासून नवीन प्लान सादर करत आहे. या नवीन प्लान्सच्या जीवावर कंपनीचे यूजर्स वाढत असल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा आपल्या यूजर्सना खुश करत BSNL ने एक स्वस्त प्रीपेड प्लान सादर केला आहे, ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे. हा स्पेशल टॅरिफ वाउचर (STV-49) कंपनीने प्रमोशनल बेसिस वर लॉन्च केला आहे.
90 दिवस मिळेल हि ऑफर
हा एसटीवी कंपनी 1 सप्टेंबर पासून ऑफर करत आहे. प्लान ऍक्टिव्हेट करण्यासाठी सेल्फकेयर कीवर्ड – ‘STV COMBO 49’ आहे. तसेच आहे प्लान कंपनी 90 दिवस ऑफर करेल. या 90 दिवसांत यूजर्सना या प्लानचा लाभ घेण्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
बीएसएनएल च्या या स्पेशल टॅरिफ मध्ये यूजर्सना एकूण 2जीबी डेटा दिला जात आहे. इतकेच नव्हे तर या प्लानची वैधता 28 दिवस आहे. त्याचबरोबर रिचार्ज मध्ये 100 फ्री एसएमएस आणि कॉलिंगसाठी 100 फ्री मिनिट्स दिले जात आहेत. फ्री मिनिट्स संपल्यावर प्रति मिनिट 45 पैसे दराने पैसे द्यावे लागतील.
600 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानची वैधता वाढली
BSNL ने आपल्या यूजर्ससाठी प्रोमोशनल प्लान म्हणून 600 रुपयांचा एक ब्रॉडबँड प्लान सादर केला होता जो 27 जुलै पर्यंतच वैध होता. पण आता कंपनीने ग्राहकांसाठी या प्लानची वैधता वाढवली आहे. बीएसएनएल यूजर आता येत्या 27 ऑक्टोबर पर्यंत हा प्लान रिचार्ज करू शकतील.
हे देखील वाचा: BSNL ची दमदार ऑफर, 24GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग असलेल्या प्लानने Jio ला देईल टक्कर
प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता 600 रुपयांमध्ये यूजर्सना एकूण 300GB डेटा दिला जात आहे जो 40Mbps स्पीडने वापरता येतो. 300जीबी संपल्यावर ग्राहक 2Mbps च्या स्पीडने वर इंटरनेट वापरू शकतात. तसेच प्लान मध्ये अनलिमिटेड नॅशनल वॉयस कॉलिंग पण फ्री मिळत आहे.
