सरकारी टेलीकॉम ऑपरेटर बीएसएनएल अनेक दिवसांपासून मोबाईल यूजर्ससाठी नवनवीन प्लान्स सादर केले आहेत. या प्लान्स सोबतच कंपनी आपल्या अनेक जुन्या प्लान्स मध्ये पण बदल करत आहे. बदल केल्यावर प्लान्स मध्ये यूजर्सना जास्त फायदे दिले जात आहेत. आता कंपनीने एक नवीन प्लान सादर केला आहे. या प्लानची किंमत 1499 रुपये आहे जो एक वर्षाच्या वैधतेसह येतो. एक वर्षाची वैधात असलेल्या या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि डेटाचा लाभ दिला जात आहे.
BSNL ने या प्लानची घोषणा आपल्या चेन्नईच्या ट्विटर अकाउंट द्वारे केली आहे. ट्विटनुसार या प्लानचे नाव PV 1499 आहे आणि 1 सप्टेंबर 2020 पासून ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. याचा अर्थ असा कि मंगळवार पासून हा रिचार्ज ग्राहक करू शकतील.
बीएसएनएल च्या 1499 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता यात ग्राहकांना 365 दिवस वैधता मिळेल. या वैधतेत ग्राहकांना एकूण 24 जीबी इंटरनेट डेटा दिला जात आहे. तसेच यूजर्स कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकतील. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये यूजर्सना रोज 100 SMS पण दिले जातील.
मिळेल अतिरिक्त 30 दिवसांची वैधता
या प्लानची खास बाब अशी आहे कि प्रमोशनल ऑफर मध्ये सुरवातीला 90 दिवसांत हा प्लॉन घेणाऱ्या ग्राहकांना 30 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. अश्याप्रकारे ग्राहक 365 ऐवजी 395 दिवसांची वैधता मिळवू शकतील.
अलीकडेच बीएसएनएल ने ब्रॉडबँड प्लान 200GB CS111 मंथली, 300GB CS112 मंथली आणि PUN 400GB मंथलीच्या नावाने सादर केले होते. या प्लान्स मध्ये यूजर्सना 400जीबी पर्यंतचा हाई-स्पीड डेटा दिला जात आहे. एका रिपोर्टनुसार, 200GB CS111 Monthly, 300GB CS112 Monthly आणि PUN 400GB Monthly तिन्ही प्लान पंजाब सर्कल मध्ये उपलब्ध आहेत.
200 जीबी सीएस111 मंथली प्लान बद्दल बोलायचे झाले तर यात ग्राहकांना 50Mbps स्पीड सह 200जीबी पर्यंतचा डेटा मिळेल. तसेच डेटा संपल्यावर सब्सक्राइबर्सना 4Mbps वर डेटा मिळत राहील. या प्लान मध्ये वॉयस कॉलिंग बेनेफिट उपलब्ध नाहीत, तसेच याची मासिक किंमत 490 रुपये आहे.
















