3 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाले Nokia 220 4G आणि Nokia 235 4G, आता बटन असणाऱ्या फोनमध्ये मिळेल स्मार्टफोनची मजा

HMD ने आपल्या नोकिया ब्रँड अंतर्गत दोन नवीन फिचर फोन भारतीय बाजारात आणले आहेत. कंपनीकडून Nokia 220 4G आणि Nokia 235 4G फोन भारतात लाँच केले गेले आहेत. हे दोन्ही बटन असणारे फोन (keypad mobile) ड्युअल सिम 4 जी कनेक्टिव्हिटीसह आले आहेत ज्यामुळे UPI Payment पण केले जाऊ शकते. याची किंमत आणि फिचर्स तुम्ही पुढे वाचू शकता.

Nokia 220 4G आणि Nokia 235 4G ची किंमत

Nokia 235 4G फोन 3,749 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तसेच Nokia 220 4G फोनची किंमत 3,249 रुपये आहे. हे दोन्ही बटन वाले फोन HMD.com आणि Amazon.in सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून पण विकत घेता येतील. नोकिया 235 4जी ला Blue, Black आणि Purple कलरमध्ये तसेच नोकिया 220 4जी ला Peach आणि Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Nokia 220 4G आणि Nokia 235 4G चे परफॉर्मन्स

Nokia 220 4G आणि Nokia 235 4G फिचर फोन S30+​ ऑपरेटिंग सिस्टमवर लाँच झाले आहेत जो Unisoc T107 प्रोसेसरवर रन करतो. या दोन्ही मोबाईल फोनमध्ये 64MB RAM आणि 128MB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच मोबाईलमध्ये गाणी, फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी 32GB चे मेमरी कार्ड पण लावले जाऊ शकते.

Nokia 220 4G आणि Nokia 235 4G चे फिचर्स

  • नोकियाच्या नवीन बटन असणाऱ्या फोनला 2.8-इंचाच्या स्क्रीनवर आणले आहे. ही मोठा व चौकोर आकाराचा QVGA डिस्प्ले आहे जो IPS पॅनलवर बनला आहे.
  • फोटोग्राफीसाठी Nokia 235 4G च्या मागे 2MP camera लावला आहे ज्याच्यासोबत एलईडी फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे. तसेच Nokia 220 4G मध्ये कॅमेरा तर नाही मिळत परंतु टॉर्च लाईट पण लावली आहे.
  • या मोबाईल फोनमध्ये YouTube पण चालवता येईल. तसेच जुनी आणि प्रसिद्ध नोकियाची साप असलेली गेम (Snake game) पण यात देण्यात आली आहे.
  • नवीन नोकिया फिचर फोनमध्ये प्रीलोडेड UPI app मिळते जे NPCI ने अप्रूव्ड आहे. याच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनवरून यूपीआय पेमेंट करू शकता.
  • कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5.0, 3.5mm हेडफोन जॅक तसेच यूएसबी टाईप सी पोर्ट मिळतो.
    फोनला जास्त वेळ चालवण्यासाठी यामध्ये 1450mAh Battery देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 9.8 तासाचा टॉकटाईम देण्याची क्षमता ठेवते.
  • मनोरंजनसाठी यामध्ये MP3 Player आणि FM Radio मिळतो ज्याला इअरफोन सह तसेच वायरलेसने पण चालविले जाऊ शकते.
  • दोन्ही फिचर फोन Dual SIM ला सपोर्ट करतात तसेच दोन्ही सिमवर 4G सर्व्हिस मिळू शकते.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here