- Citroen नं आपली इलेक्ट्रिक कार eC3 भारतात सादर केली आहे.
- Citroen eC3 सिंगल चार्जवर 320km ची रेंज मिळेल.
- eC3 मध्ये 2 एयरबॅग्स आणि 170mm चा ग्राउंड क्लीयरेंस आहे.
Citroen India नं अखेरीस आपली नवीन Citroen eC3 EV hatchback सादर केली आहे. भारतात सादर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक Citroen eC3 चा लुक पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. परंतु कंपनीनं या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीवरील पडदा हटवला नाही. परंतु, कंपनी लवकरच किंमतीचा याबाबत खुलासा करेल, अशी अपेक्षा आहे. C3 hatchback च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची खासियत म्हणजे यात 29.2kWh चा बॅटरी पॅक मिळतो जो 320KM ची रेंज देतो.
Tata Tiago EV ला मिळणार टक्कर
eC3 hatchback मध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात 10.2-inch इंफोटेंमेंट, ड्युअल एयरबॅग्स आणि ड्राईव्हिंग मोड्सचा समावेश आहे. Citroen electric hatchback ची टक्कर अलीकडेच भारतात आलेल्या Tata Tiago EV शी होईल, ज्यात 315KM ची रेंज मिळते. वर सांगितल्याप्रमाणे आम्ही Citroen eC3 अपने ICE-पावर्ड सिबलिंग फ्रेंच ऑटोमेकरच्या C3 हॅचबॅक सारखी दिसते. यात सिट्रोन लोगो आणि सेमी-क्रॉसओव्हर डिजाइन असलेली स्लीक ग्रिल देण्यात आली आहे.
Citroen eC3 ची रेंज
यात 170mm चा ग्राउंड क्लियरन्स मिळतो. तसेच, Citroen eC3 मध्ये 29.2kWh चा बॅटरी पॅक आहे. त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे जी 57hp पीक पावर आणि 143Nm पीक टॉर्क देते. ईसी3 मध्ये 320 किमीची एआरएआय-सर्टिफाइड रेंज देण्यात आली आहे आणि यात दोन ड्राईव्हिंग मोड ईको आणि स्टँडर्ड आहेत.
Citroen eC3 चा स्पीड
कंपनीचा दावा आहे की eC3 फक्त 6.8 सेकंदात 0 ते 60 किमी ताशी वेग गाठू शकते. या ई-कारचा टॉप स्पीड 107 किमी ताशी आहे. ईसी3 डीसी फास्ट चार्जिंगचा स्वीकार करतो जो 57 मिनिटांत ही कार 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. हे देखील वाचा: Jio नं लाँच केले रोज 2.5GB डेटा असलेले दोन प्लॅन; 90 दिवसांपर्यंतची जबरदस्त वैधता
eC3 इंफोटेनमेंट सिस्टमसाठी 10.2 इंचाची टचस्क्रीन मिळते, ज्यात Apple CarPlay आणि Android Auto, 4 स्पिकर, MyCitroen Connect अॅपच्या माध्यमातून कनेक्ट करता येईल. फ्रेंच ऑटोमेकर बॅटरी पॅकवर 7 वर्ष/1,40,000 किलोमीटरची वॉरंटी, इलेक्ट्रिक मोटरवर 5 वर्ष/1,00,000 किलोमीटरची वॉरंटी आणि कारवर 3 वर्ष/1,25,000 किलोमीटरची वॉरंटी देखील देईल.
Note: या ई-कारचे रिजर्वेशन 22 जानेवारी, 2023 पासून सुरु होईल आणि हा मॉडेल पुढील महिन्यात डीलरशिपवर येईल.
