Jio नं लाँच केले रोज 2.5GB डेटा असलेले दोन प्लॅन; 90 दिवसांपर्यंतची जबरदस्त वैधता

jio 5g works on 4g sim
Highlights

  • Jio नं 349 रुपये आणि 899 रुपयांचे रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत.
  • दोन्ही प्लॅनमध्ये युजर्सना 2.5जीबी डेली डेटा दिला जात आहे.
  • रिचार्ज कंपनीनं गुपचूप आपल्या साइट आणि अ‍ॅपवर लिस्ट केला आहे.

Reliance Jio नं ग्राहकांना सरप्राइज देत एकाच वेळी दोन नवीन प्रीपेड प्लॅन (prepaid recharge plan) लाँच केले आहेत. लाँच करण्यात आलेल्या नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत 349 रुपये व 899 रुपये आहे. दोन्ही प्लॅनमध्ये शानदार वॅलिडिटी, जास्त डेटा सोबतच Jio Apps ची सुविधा दिली जात आहे. तसेच खास बाब अशी की या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 2.5जीबी डेटा मिळेल. म्हणजे हा प्लॅन त्यांच्यासाठी बेस्ट आहे जे ग्राहक जास्त डेटा असलेले प्लॅन शोधत आहेत. चला जाणून घेऊया New Jio Plan मध्ये मिळणारी फायदे.

Reliance Jio Rs 349 prepaid recharge plan

रिलायन्स जियोच्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. म्हणजे जर तुम्हाला 28 दिवसांचा प्लॅन आवडत नसेल तर हा संपूर्ण महिन्यांची वैधता देणारा एक बेस्ट रिचार्ज ठरू शकतो. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यावर जवळपास एक महिन्यापर्यंत पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. हे देखील वाचा: 108MP camera सह येतोय OnePlus Nord CE 3 5G; काही मिनिटांत फुल चार्जसाठी मिळणार 67W Fast Charging

Jio 349 Plan मध्ये कंपनी युजर्सना रोज 2.5 जीबी 5जी इंटरनेट डेटा देत आहे. डेली 2.5जीबी डेटाच्या हिशोबाने संपूर्ण प्लॅनमध्ये जियो युजर्सना एकूण 75GB डेटा वापरण्यासाठी मिळेल. डेटा संपल्यावर 64 Kbps स्पीडवर देखील डेटा वापरता येईल.

ग्राहकांना या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. म्हणजे युजर्स पूर्णपणे 30 दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येईल. अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉलिंग ऑन नेटवर्क आणि ऑफ नेटवर्क दोन्ही नंबर्सवर मिळत आहे.

फ्री कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त प्लॅनमध्ये रोज 100 एसएमस फ्री मिळतील. इतकेच नव्हे तर ग्राहकांना Jio Apps चा अ‍ॅक्सेस मिळेल. प्लॅनमध्ये जियोनं JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. हे देखील वाचा: OTT वर या दिवशी येणार शाहरुख खानचा Pathaan, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही फिल्म

Reliance Jio Rs 899 prepaid recharge plan

Jio चा 899 रुपयांचा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये डेली 2.5जीबी डेटा दिला जात आहे, त्यामुळे युजर्सना एकूण 225 जीबी डेटा मिळतो. इतकेच नव्हे तर युजर्सना रिचार्जमध्ये 90 दिवस अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच डेली अनलिमिटेड 100SMS सह Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चं कम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here