Home बातम्या OnePlus Nord LE झाला लॉन्च, मोफत मिळू शकतो शानदार स्मार्टफोन फक्त करावे लागेल इतकेच

OnePlus Nord LE झाला लॉन्च, मोफत मिळू शकतो शानदार स्मार्टफोन फक्त करावे लागेल इतकेच

OnePlus ने आज आपल्या फॅन्ससाठी एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने OnePlus Nord चा स्पेशल एडिशन मार्केटमध्ये उतरवला आहे जो OnePlus Nord LE नावाने लॉन्च झाला आहे. इथे वनप्लस नॉर्ड ‘एलई’ चा फुलफॉर्म आहे वनप्लस नॉर्ड ‘लिटरली ओनली वन एडिशन’. सुरवातीलाच सांगू इच्छितो कि हा फोन कोणताही नवीन मॉडेल नाही तर जुन्या OnePlus Nord स्मार्टफोनचा नवीन कलर वेरिएंट आहे. पण या नवीन वेरिएंटची खासियत अशी आहे कि वनप्लस कंपनी OnePlus Nord LE स्मार्टफोन मोफत विकत आहे आणि यासाठी कोणतीही डिस्काउंट किंवा एक्सचेंज ऑफर आली नाही तर मोबाईल फोनच मोफत मिळत आहे. (Company giving offer Oneplus Nord LE free of cost how to get)

असा आहे हा नवीन मॉडेल

OnePlus Nord LE लुकच्या बाबतीत वनप्लस नॉर्ड सारखाच आहे ज्यात फ्रंट पॅनलवर डुअल पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे आणि बॅक पॅनलवर वर्टिकल शेप क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. डिजाईनमधील वेगळेपणा म्हणजे फोनचा रंग. वनप्लस नॉर्ड एलईचा बॅक पॅनल Yelow आणि Blue कलरचा आहे. पिवळा रंग वरच्या भागात आणि निळा रंग खालच्या भागात आहे. म्हणजे फोन कसा पकडतो यावरून OnePlus Nord LE दोन वेगवेगळ्या रंगात दिसू शकतो. याव्यतिरिक्त फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स OnePlus Nord सारखे आहेत.

अश्याप्रकारे मिळेल मोफत फोन

वनप्लसने आपला हा फोन विकण्यासाठी नाही तर मोफत देण्यासाठी बनवला आहे. OnePlus Nord LE मोफत मिळवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घ्यावी लागेल आणि वनप्लस नॉर्डच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करावे लागेल. त्यांनतर जो स्मार्टफोन सध्या वापरत असाल त्याचा फोटो क्लिक करून आपल्या इंस्टाग्राम फीडवर पोस्ट करावा लागेल. पोस्ट करताना युजरला आपण का OnePlus Nord वर अपडेट करू इच्छित आहोत हे लिहावे लागेल. या पोस्टमध्ये #SwitchToNord हॅशटॅगचा वापर करणे अनिवार्य आहे. असे केल्यानंतर वनप्लस ठरवेल कि तुम्ही लेटेस्ट OnePlus Nord LE चे मालक बनू शकाल कि नाही.

हे देखील वाचा : 18GB रॅम आणि सर्वात पावरफुल फीचर्ससह बाजारात आला अजून एक फोन, आता रंगेल गेमिंग फोन्समधील युद्ध

स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे OnePlus Nord LE चे स्पेसिफिकेशन्स वनप्लस नॉर्ड सारखे आहेत. OnePlus Nord मध्ये 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) फ्लूइड एमोलेड डिस्प्ले आहे, जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियोसह येतो. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. हा फोन कंपनी द्वारे अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर सादर केला गेला आहे जो आक्सिजनओएससह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वालकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 765जी आहे. ग्राफिक्ससाठी फोन एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो. OnePlus Nord मध्ये 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4115एमएएचची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्डमध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यातले चार मागे आणि दोन फ्रंटला आहेत. डिवाइसच्या मागे डावीकडे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये Sony IMX586 सेंसरसह OIS फीचर असलेला 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. तसेच फोनमध्ये अपर्चर f/2.25 सह 8 मेगापिक्सल अल्ट्र-वाइड अँगल लेंस, अपर्चर f/2.24 सह 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक अपर्चर f/2.24 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन के फ्रंटला डुअल कॅमेरा आहे. यात पहिला कॅमेरा अपर्चर f/2.45 सह SonyIMX616 32 मेगापिक्सलचा आहे आणि दुसरा कॅमेरा अपर्चर f/2.45 सह 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे. फ्रंट कॅमेऱ्यात फीचर्स म्हणून फेसअनलॉक, एचडीआर, स्क्रीन फ्लॅश, फेस रीटचिंग, फिल्टर, आणि अल्ट्रा वाइड सेल्फी ऑप्शन आहे.

अशी आहे किंमत

OnePlus ने आपला नवीन फोन तीन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 24,999 रुपये आहे. तसेच फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपये तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

वनप्लस नॉर्ड व्हिडीओ