18GB रॅम आणि सर्वात पावरफुल फीचर्ससह बाजारात आला अजून एक फोन, आता रंगेल गेमिंग फोन्समधील युद्ध

Lenovo ने आपला दमदार आणि लेटेस्ट गेमिंग स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Legion Phone Duel 2 नावाने लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला बाजारातील Nubia Red Magic 6 आणि Asus ROG Phone 5 कडून आव्हान मिळणार आहे. नवीन फ्लॅगशिप गेमिंग स्मार्टफोन Legion Phone Duel 2 सध्या फक्त चीनमधेच लॉन्च केला गेला आहे. भारत किंवा इतर बाजारांमध्ये या फोनच्या उपलब्धतेबाबत अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. चला पुढे जाणून घेऊया लेनोवो लीजन फोन डुअल 2 मध्ये काय आहे विशेष जे याला एक खास गेमिंग व फ्लॅगशिप डिवाइस बनवतात. (Lenovo Legion 2 Pro gaming smartphone launched with up to 18GB RAM)

डिजाइन आहे खास

या गेमिंग स्मार्टफोनची डिजाइन पाहता फोनच्या बॅक पॅनलवर समितीय डिजाइन देण्यात आली आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलच्या मध्यभागी वर येणारा भाग आहे. यात कॅमेऱ्याव्यतिरिक्त एक फॅन आणि RGB लाइटिंग तसेच लीजनचा लोगो देण्यात आला आहे. फोनच्या कडेवर कूलिंग वेंट देण्यात आले आहेत. तसेच, फ्रंट लुक पाहता यात कोणताही पंच होल व नॉच नाही. फोनच्या तिन्ही बाजूंना बेजल खूप कमी आहेत. तसेच फोनच्या बॉटमला बारीक चिन पार्ट मिळेल. इतकेच नव्हे तर सेल्फी कॅमेऱ्यासाठी फोनमध्ये पॉप कॅमेरा आहे जो बाजूला देण्यात आला आहे. फोनची खासियत अशी आहे कि यात ट्विन-टर्बो फॅन अ‍ॅक्टिव्ह कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, जी तीव्र वापराच्या वेळी फोन थंड ठेवते.

हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा सेल, यात आहे 6GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी

कमालीचा डिस्प्ले

Lenovo च्या Legion Phone Duel 2 मध्ये कंपनीने 6.92-इंचाची FHD+ E4 AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20.5:9 आहे. फोनचा डिस्प्ले 144Hz के रिफ्रेश रेट आणि 720Hz च्या टच रिस्पॉन्स रेटसह येतो. तसेच डिस्प्ले DCI-P3 color gamut, HDR10+ आणि DC dimmingला सपोर्टसह काम करतो. लेनोवोने गेमर्सच्या वेगवेगळ्या कंट्रोलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र डिस्प्ले चिप पण जोडली आहे, स्क्रीनव्यतिरिक्त, फ्रेममध्ये एकूण सहा बटण आहेत जे मागे कवरच्या डाव्या कडेवर आणि डिवाइसच्या वर आणि खालच्या भागावर आहेत. कंट्रोल पॅनलवर एकसाथ आठ फिंगर सपोर्ट बटण आहेत.

प्रोसेसिंग पावर

फोनमध्ये प्रोसेसिंग पावरसाठी स्नॅपड्रॅगॉन 888 एसओसी Adreno 660 GPU सह देण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 मध्ये 25 टक्के पर्यंत वेगवान CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के जास्त जलद ग्राफिक्ससह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो. तसेच फोनमध्ये 18जीबी पर्यंतचा रॅम आणि 512जीबी पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज आहे.

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह एक 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेंसचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा मोटराइज्ड साइड पॉप-अप कॅमेरा मिळेल. फोन ऑडियो झूम फीचर आहे. तसेच कॅमेऱ्यातून युजर 8K आणि 4K विडियो पण शूट करू शकतात.

पावरफुल बॅटरी

फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बॅक कवर, ऑल-मेटल मिडिल फ्रेम, डुअल एक्स-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर्स आहे, जी मागील फोन प्रमाणेच आहे. यात 0.7 एमएम डुअल स्पीकर, ज्यात एक 1.6 सीसी साउंड कॅविटी आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट आहे, पण यात 3.5 मिमी हेड फोन्स जॅक नाही. फोनच्या मागे आणि डाव्या भागावर चार्जिंगच्या वेळी लवचिकता मिळावी म्हणून यूएसबी टाइप-सी पोर्ट आहेत. यात पावर बॅकअपसाठी 5,500mAh ची बॅटरी आहे जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करती आहे.

हे देखील वाचा : Xiaomi चा सर्वात दमदार स्मार्टफोन Mi 11 Ultra भारतात विक्रीसाठी इथे होईल उपलब्ध

किंमत

Lenovo Legion Phone Duel 2 कंपनीने दोन कलर Dawn आणि Gradient मध्ये सादर केला आहे. या डिवाइसच्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 3,699 yuan (जवळपास 42,100 रुपये), 12GB + 128GB वेरिएंटची किंमत 4,099 yuan (जवळपास 46,660 रुपये), 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 4,399 yuan (जवळपास 50,100 रुपये), 16GB + 512GB वेरिएंटची किंमत 5,299 yuan (जवळपास 60,345 रुपये) आणि हाय एन्ड मॉडेल 18GB + 512GB ची किंमत 5,999 yuan (जवळपास 68,280 रुपये) आहे. फोन चीनमध्ये 9 एप्रिलपासून विकला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here