Vivo V17 भारतात पंच-होल डिजाइन डिस्प्ले सह सादर केला जाईल. कंपनीने काही दिवसांपुवी रशियात Vivo V17 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला होता. पंच-होल डिजाइनची माहिती आम्हाला इंडस्ट्री सोर्स कडून मिळाली आहे. अलीकडेच 91मोबाईल्सने एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि Vivo V17 भारतात डिसेंबर मध्ये लॉन्च केला जाईल. याची किंमत भारतीय मार्केट मध्ये 22,000 रुपयांच्या आसपास असेल.
आता आम्हाला भारतात येणाऱ्या Vivo V17 च्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे कंपनीने अलीकडेच रशियात V17 वॉटरड्रॉप नॉच डिजाइन सह सादर केला आहे. भारत वीवो साठी मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे आपल्या फोनला पंच-होल डिजाइन सह प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो जसा गॅलेक्सी एस10 मध्ये होता.
हे देखील वाचा: जगातील पहिला 60x Super Zoom आणि 64MP सेंसर असलेला स्मार्टफोन Vivo X30 येणार आहे बाजारात, बदलेले कॅमेऱ्यांची व्याख्या
दमदार कॅमेरा
फोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता Vivo V17 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा जीएम1 सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चरची 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo V17 एफ/2.0 अपर्चरच्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
वीवो चा हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo V17 कंपनीने इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित फनटच 9.2 ओएस वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.
हे देखील वाचा: 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला VIVO U20, फक्त 10,990 रुपयांमध्ये मिळेल हा शानदार फोन
Vivo V17 रशिया मध्ये 8 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Vivo V17 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता रशिया मध्ये हा फोन 22,990 रुबल मध्ये लॉन्च केला गेला आहे जे इंडियन करंसी नुसार 25,800 रुपये होतात.
