91मोबाईल्स ने गेल्या महिन्यात माहिती दिली होती कि वीवो कंपनी भारतात आपला मोबाईल पोर्टफोलियो बदलणार आहे. यासाठी कंपनी वाय सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च करेल. बातमी मिळाली होती कि वीवो लवकरच भारतात वाई5 आणि वाय3 स्मार्टफोन लॉन्च करेल. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या नावांसोबत आम्ही फोनचे काही स्पेसिफिकेशन्स पण सांगितले होते. तर आज आम्ही अजून एक एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत कि वीवो भारतात वाय सीरीज मध्ये Y17 फोन पण लॉन्च करेल. Vivo Y17 या महिन्यात भारतीय बाजारात येईल.
एक्सक्लूसिव डिटेल
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वीवो भारतात आपली वाय स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे. या सीरीज मध्ये कंपनीचा पहिला स्मार्टफोन Y17 नावाने लॉन्च केला जाईल. Vivo Y17 तोच स्मार्टफोन असेल ज्याचे नाव आधी Y5 म्हणून समोर आले होते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Vivo Y17 भारतात 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन आनलाईन प्लॅटफॉर्म सोबत आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्री साठी उपलब्ध होईल. 91मोबाईल्सला या फोनचा फोटो पण मिळाला आहे. या फोटो मध्ये फोनचे फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे.
Vivo Y17 लुक
Vivo Y17 कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या वरच्या पॅनल वर ‘यू’ शेप नॉच देण्यात येईल. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट दिला जाईल. Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. या कॅमेरा सेटअप खाली फ्लॅश लाईट असेल. Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट असेल.
हे देखील वाचा: Xiaomi करणार आहे धमाका : 24 एप्रिलला लॉन्च होईल Redmi Y3, 32-एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह असेल मोठी बॅटरी
Vivo Y17 स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo Y17 एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल. आम्हाला Vivo Y17 च्या कॅमेरा सेग्मेंटची माहिती मिळाली नाही पण फोनच्या बॅक पॅनल वरील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप वाइड एंगल आणि डेफ्थ सेंसिंग लेंस सह येईल तसेच कंपनी Vivo Y17 च्या रियर कॅमेऱ्यात एआई टेक्नॉलॉजी देईल.
तसेच काही लीक्स पाहता Vivo Y17 मध्ये 6.35-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. एंडरॉयड 9 पाई सह या फोन मध्ये मीडियाटेकचा हेलीयो पी35 चिपसेट मिळेल. तसेच वीवो आपला हा फोन 4जीबी रॅम सह भारतीय बाजारात आणू शकते. काही दिवसांपूर्वी वीवोचे दोन फोन V1901A आणि V1901T चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट केले गेले होते आणि यांत पण ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला होता.
अशा आहे कि हे मॉडेल नंबर वाले फोन वीवो वाय सीरीजचे फोन असतील. टेना वर पण फोन मध्ये 6.35-इंचाची स्क्रीन असेल असे सांगण्यात आले होते. या साइट वर फोनचे डायमेंशन 159.43×76.77×8.92एमएम होते.
