Xiaomi करणार आहे धमाका : 24 एप्रिलला लॉन्च होईल Redmi Y3, 32-एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह असेल मोठी बॅटरी

Xiaomi इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनी अलीकडेच आपल्या ऑफिशियल ट्विटर अकांउट वर एक विडियो पोस्ट केला होता. या वीडियो मधून समजले होते कि कंपनी एखाद्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे​ ज्यात 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. अंदाज लावले जात होते कि हा फोन शाओमीच्या रेडमी वाय सीरीजचा आगामी डिवाईस Redmi Y3 असेल. आज कंपनी ने या फोन वर शिक्कामोर्तब केला आहे. शाओमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत खुलासा केला आहे कि कंपनी येत्या 24 एप्रिलला भारतात एक ईवेंट आयोजित करणार आहे आणि या ईवेंट मधून शाओमीचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हा फोन Redmi Y3 असेल.

Redmi Y3 लॉन्च डिटेल
शाओमी ने मीडिया इन्वाईट सोबत आपल्या ट्वीटर हँडेल वर पण या लॉन्च ईवेंटची माहिती दिली आहे. शाओमी इंडिया 24 एप्रिलला राजधानी दिल्लीत एका ईवेंटचे आयोजन करेल ज्यात Redmi Y3 लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे शाओमी ने अजूनपर्यंत Redmi Y3 चे नाव उघड केले नाही. पण कंपनी आपल्या प्रत्येक ट्वीट, बॅनर व मीडिया इन्वाईट मध्ये Why च्या जागी Y लिहीत आहे. म्हणजे 24 एप्रिलला लॉन्च होणारा फोन Redmi Y3 असेल. 24 एप्रिलला लॉन्च झाल्यांनतर हा फोन कधी सेल साठी उपलब्ध होईल हि माहिती फोन लॉन्च सोबत मिळेल.

32-एमपी सेल्फी कॅमेरा
Xiaomi ने Redmi Y3 च्या नावासोबत फोनचे स्पेसिफिकेशन्स पण लपवून ठेवले आहेत. इतर सर्व स्पेसिफिकेशन्स लपवत कंपनी ने Redmi Y3 च्या फक्त कॅमेरा सेग्मेंटचा खुलासा केला आहे. आपल्या ट्वीट मध्ये शाओमी ने ​सांगितले आहे कि कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Redmi Y3 मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनचा हा सेल्फी कॅमेरा कोणत्या खास फीचर्स व टेक्नॉलॉजी सह येईल हे अजून समजले नाही पण शाओमी Redmi Y3 च्या फ्रंट कॅमेऱ्याला 32MP Super Selfie कॅमेरा म्हणत आहे.

हे देखील वाचा: फक्त अडीच वर्षात 30 कोटी यूजर मिळवून Jio ने केली कमाल

पावरफुल असेल बॅटरी
शाओमी ने Redmi Y3 संबंधित आपल्या ट्वीट मध्ये एक वीडियो पण शेयर केला आहे. या वीडियो मध्ये विचारण्यात आले आहे कि एकदा फुल चार्ज केल्यांनंतर तुमचा फोन किती वेळ चालतो. हा वीडियो बघून बोलले जात आहे कि Xiaomi Redmi Y3 कपंनी द्वारा मोठ्या व पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन मध्ये बॅटरी 4,500एमएएच किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तसेच याची पूर्ण अशा आहे कि शाओमी Redmi Y3 फोन फास्ट चार्जिंग टेक्ननॉलॉजी सह आणेल.

डॉट ड्रॉप नॉच
शाओमी कडून आलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये Redmi Y3 च्या सेल्फी कॅमेरा सह फोनच्या डिस्प्ले डिजाईनची माहिती मिळाली आहे. या फोटो मध्ये डॉटड्रॉप नॉच दाखवण्यात आली आहे. या नॉच मध्ये Redmi Y3 चा सेल्फी कॅमेरा असेल. नॉच डिस्प्ले बघून म्हणू शकतो कि Redmi Y3 फ्रंट लुकच्या बाबतीत शाओमी द्वारा लॉन्च स्मार्टफोन रेडमी नोट 7 प्रो सारखा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here