Home बातम्या 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M51 वर मिळत आहे 3,000 रुपयांचा डिस्काउंट, गमावू नका हि ऑफर

7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M51 वर मिळत आहे 3,000 रुपयांचा डिस्काउंट, गमावू नका हि ऑफर

फेस्टिव सीजन पाहता Samsung ने आपल्या अनेक स्मार्टफोन्स वर डीलची घोषणा केली आहे. याच डील पैकी एक शानदार ऑफर Galaxy M सीरीज मध्ये येत्या सर्वात दमदार फोन Galaxy M51 वर दिली जात आहे. हा फोन आकर्षक सूट आणि ऑफर्स सह अमेझॉन इंडिया वर विकत घेता येईल. Galaxy M51 ची किंमत 24,999 रुपये आहे. सॅमसंगने एक ट्वीट केले आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि हा फोन ग्राहक 19,499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात.

डिस्काउंट

Galaxy M51 च्या खरेदीवर 3,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर ऑफर अंतगर्त हा फोन 22,499 रुपयांमध्ये लिस्ट आहे. तसेच 3,000 रुपयांचा कार्ड डिस्काउंट दिला जात आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy Note20 FE लवकरच येईल एंट्री, ऑफिशियल साइट वर झाला लिस्ट

स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एम51 मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि हँडसेट मध्ये 128 जीबी पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज आहे, जी माइक्रोएसडी कार्डचा वापर करून वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये मागे क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

तसेच रियर कॅमेरा सेटअप प्रमाणे Samsung Galaxy M51 चा सेल्फी कॅमेरा पण शानदार आहे. सॅमसंगचा हा फोन 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 फ्रंट कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो जो डिस्प्लेच्या वरच्या भागात पंच-होल मध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 चा फ्रंट कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो.

हे देखील वाचा : भारतात येत आहे किफायतीशीर Samsung Galaxy M02, जाणून घ्या संपूर्ण माहिती

फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ 5 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक आहेत. तसेच फोनच्या मागे एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. सॅमसंगच्या या फोन मध्ये 7000mAh ची बॅटरी आहे जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.