Samsung Galaxy M02 बद्दल अनेक दिवसांपासून लीक बातम्या समोर येत आहेत. हा लो बजेट सेगमेंट मध्ये येणारा हँडसेट Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन वेबसाइट वर स्पॉट केला गेला आहे. यावरून स्पष्ट झाला आहे कि Samsung ने आपल्या नवीन बजेट स्मार्टफोन वर काम करायला सुरवात केली आहे. गॅलेक्सी एम सीरीज मध्ये दक्षिण कोरियन कंपनी नवीन बजेट फोन लॉन्च करू शकते. आगामी Galaxy M02 कंपनीच्या Galaxy M01 चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. बातम्यांनुसार नवीन फोन गॅलेक्सी ए02 चा रीब्रँडेड वर्जन असेल.
BIS (Bureau of Indian Standards) सर्टिफिकेशन वर Galaxy M02 (SM-M025F/DS) मॉडेल नंबर सह स्पॉट केला गेला आहे. अपकमिंग स्मार्टफोन डुअल-सिम स्लॉट सह येईल. काही दिवसांपूर्वी हा बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंच वर दिसला होता. स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-A025F सह लिस्ट केला गेला होता. लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर असू शकतो. लिस्टिंगनुसार फोन 1.80 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणाऱ्या स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल. बेंचमार्क स्कोर पाहता SM-A025F मॉडेल नंबर असलेला या हँडसेटने सिंगल-कोर मध्ये 751 तर मल्टी-कोर मध्ये 3,824 स्कोर मिळवला आहे.
हे देखील वाचा : Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात
तसेच आधी आलेल्या माहितीनुसार Galaxy M02 Qualcomm Snapdragon 450 प्रोससेर, 2GB रॅम, 32GB स्टोरेज, माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि अँड्रॉइड 10 सह सादर केला जाईल. आशा आहे कि फोनचा 3GB रॅम वेरिएंट पण मार्केट मध्ये येईल.
Samsung Galaxy A02 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई सह चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.
हे देखील वाचा : Exclusive: या दमदार फीचर्स सह एंट्री करेल Samsung Galaxy S21 Ultra, लवकरच होईल लॉन्च
लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असू शकतो. सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A02 मध्ये 3,500एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.















