Home बातम्या कमालीच्या फीचर्स सह नवीन वर्षात येईल Google Pixel 6, समोर आला पेटंट

कमालीच्या फीचर्स सह नवीन वर्षात येईल Google Pixel 6, समोर आला पेटंट

गुगलने यावर्षी आपल्या पिक्सल सीरीजच्या पाचव्या जनरेशनचा हँडसेट Pixel 5 लॉन्च केला होता. तसेच, आता फोनचा अपग्रेडेड वेरिएंट Google Pixel 6 च्या सुरवातीच्या अफवा इंटरनेटवर समोर येऊ लागल्या आहेत. Google Pixel 5 प्रमाणे हा पण मिड-रेंज मध्ये सादर केला जाईल का हे बघणे बाकी आहे. पहिल्यांदा कथितरित्या एक नवीन पिक्सल स्मार्टफोनचा पेटंट फाइल केला आहे. हा पेटंट एक अंडर डिस्प्ले कॅमेरा स्मार्टफोनचा आहे जो आगामी गुगल पिक्सल 6 मध्ये असू शकतो.

गुगलकडे सध्या चार डिजाइनचे पेटंट आहे, त्यातील आपल्याला भविष्यातील पिक्सल स्मार्टफोन मिळू शकतो. जर आगामी काळात गुगलचे स्मार्टफोन असे असले तर यातील एकात अंडर-डिस्प्ले कॅमेरा दिला जाऊ शकतो. पेटंटच्या डॉक्यूमेंट्स मध्ये स्पष्टपणे इन डिस्प्ले कॅमेरा असे लिहिण्यात आले नाही.

पेटंट नुसार Google Pixel 6 मध्ये एक अंडर-डिस्प्ले कॅमेरा लेंस असू शकते. याचे अतिरिक्त पेटंट सांगतात कि रियर-कॅमेरा डिजाइन पिक्सल 5 सारखी असेल, ज्याचा अर्थ असा आहे कि मॉड्यूल मध्ये दोन सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश असेल.

हे देखील वाचा : स्वस्त Google Pixel 4A भारतात झाला लॉन्च, खास कॅमेरा फीचर्स आहेत यात

Google व्यतिरिक्त, वेगवेगळे फोन निर्माता साल 2021 मध्ये अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह आपले फोन लॉन्च करू शकतात. ZTE Axon 20 5G अंडर-डिस्प्ले कॅमेरा टेक्नोलॉजी सह येणारा पहिला फोन आहे जो विक्रीसाठी आला होता. पेटंट आगामी स्मार्टफोन बाबत खूप काही सांगत नाही, पण अलीकडेच आलेल्या रिपोर्ट्स मध्ये दावा केला गेला आहे कि Google Pixel 6 च्या स्पेसिफिकेशन्स मध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC असेल. फोन 2021 च्या उत्तरार्धात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

गुगल पिक्सल 5 व्हिडीओ