Google Pixel 4A अखेरीस भारतात लॉन्च करण्यात आला आहे. पिक्सल फॅन्स या फोनची वाट बघत होते जी आज संपली आहे. कंपनीने फोनची किंमत सांगून विक्री डेटची पण माहिती दिली आहे. फोन भारतात येण्याआधी ग्लोबल मार्केट मध्ये आला आहे. त्यामुळे किंमत वगळता फोन संबंधित जवळपास सर्व माहिती आपल्या समोर आली होती. चला पाहूया गूगल पिक्सल 4ए ची किंमत आणि विक्री माहिती सह फोनच्या फीचर्सची माहिती.
Google Pixel 4a
गूगल पिक्सल 4ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.81 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वर डावीकडे पंच-होल आहे. Google Pixel 4a मध्ये आलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर आणि 443पीपीआई ला सपोर्ट करतो.
Google Pixel 4a एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 6 जीबी जीबी रॅम सह बाजारात आणला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन प्रीलोडेड गूगल असिस्टेंट सह येतो ज्या सोबत लाईव कॅप्शन सपोर्ट आणि रियल टाईम ट्रांसस्क्रीप्ट सारखे फीचर्स पण गूगल पिक्सल 4ए मध्ये देण्यात आले आहेत.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्स सह येतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे ज्या सोबत फोन मध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.
किंमत
भारतात Google Pixel 4a ची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे, पण हा 16 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वर 29,999 रुपयांच्या विशेष किंमतीत उपलब्ध होईल. फोन जस्ट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो. तसेच कंपनीने गूगल नेस्ट ऑडियो पण सादर केला आहे, ज्याची किंमत 7,999 ठेवण्यात आली आहे. पिक्सल 4ए प्रमाणेच फ्लिपकार्टच्या माध्यमातून हा 6,999 रुपयांच्या विशेष किंमतीत उपलब्ध होईल. नेस्ट ऑडियो चॉक आणि चारकोल रंगात येतो. Pixel 4a ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त लवकरच देशातील रिटेल आउटलेट Reliance Retail आणि Tata Cliq मध्ये उपलब्ध होईल. भारतात Google Pixel 4A ला iPhone SE 2020 कडून टक्कर मिळू शकते.
गूगल पिक्सल 4ए वीडियो













