Categories: बातम्या

आयफोनच्या तोडीचा फोन आज येतोय! भारतात देखील Google Pixel 7, Pixel 7 Pro होणार लाँच, जाणून घ्या किंमत

अँड्रॉइड स्मार्टफोन्सपैकी गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनचा दर्जा वेगळा आहे. आज 6 ऑक्टोबरला Made by Google इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फ्लॅगशिप डिवाइससह Google Pixel Watch सह अन्य स्मार्ट डिवाइस देखील सादर केले जाऊ शकतात. या लाँच इव्हेंटचं थेट प्रक्षेपण केलं जाईल, त्याची माहिती जाणून घेऊया.

आज येणार Pixel 7 सीरिज

गुगलचा Made by Google इव्हेंट आज, 6 ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30pm वाजता सुरु होईल. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या इव्हेंटचं थेट प्रक्षेपण कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून बघता येईल. गुगल या इव्हेंटच्या माध्यमातून Google Pixel 7, Pixel 7 Pro आणि Pixel Watch लाँच करेल. तसेच Nest smart home पोर्टफोलियोचा विस्तार केला जाईल. विशेष म्हणजे गुगलनं आधीच Pixel 7 आणि Pixel 7 Pro चे प्री-ऑर्डर घेण्यास भारतात सुरुवात केली आहे. हे देखील वाचा: स्मार्टफोन असावा तर असा! 200MP कॅमेरा, 180W फास्ट चार्जिंग; Infinix Zero Ultra 5G ची किंमतही कमी

Google Pixel 7, Pixel 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Google Pixel 7 सीरीजची डिजाइन कंपनीनं आधीच दाखवली आहे तर स्पेक्स देखील लीक झाले आहेत. त्यानुसार, आगामी गुगल पिक्सल स्मार्टफोन्समध्ये Google Tensor G2 प्रोसेसर आणि Titan M2 सिक्योरिटी चिप मिळेल. सीरीजचे दोन्ही डिवाइस 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होतील. Pixel 7 मध्ये 8GB RAM मिळेल आणि Pixel 7 Pro मध्ये 12GB RAM मिळू शकतो.

Google Pixel 7 मध्ये 6.3-इंचाचा FHD+ डिस्प्ले असेल जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP + 12MP असा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तर मोठ्या Google Pixel 7 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ LTPO स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकते. प्रो मॉडेलच्या रियर पॅनलवर तीन कॅमेरा सेन्सर्स मिळतील, ज्यात प्रायमरी आणि अल्ट्रावाइड लेन्ससह एक 48MP टेलीफोटो लेन्स देखील मिळेल. Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro डिवाइसमध्ये समोर एक 10.8MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेटमध्ये शानदार 2K डिस्प्ले; 8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Redmi Pad ची भारतात एंट्री

Google Pixel 7, Pixel 7 Pro ची संभाव्य किंमत

मीडिया रिपोर्ट्समधून Pixel 7 Series ची युरोपियन किंमत लीक झाली आहे. त्यानुसार Pixel 7 ची किंमत Pixel 7 649 युरो असेल, ही किंमत भारतीय चलनात रूपांतरित केल्यास 52,500 रुपयांच्या आसपास होते. तर या सीरिजमधील मोठा मॉडेल Pixel 7 Pro स्मार्टफोन 899 युरो (जवळपास 72,700 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.

Published by
Siddhesh Jadhav