स्मार्टफोन असावा तर असा! 200MP कॅमेरा, 180W फास्ट चार्जिंग; Infinix Zero Ultra 5G ची किंमतही कमी

200MP Camera 180W Fast Charging Smartphone Infinix Zero Ultra 5G Launched Price Specifications

मोटोरोलानं जगातील सर्वात पहिला 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर केला होता. त्यानंतर शाओमीनं देखील या सेन्सरचा वापर आपल्या फोनमध्ये केला आहे. परंतु हे दोन्ही स्मार्टफोन्स 50 हजारांच्या वरच्या बजेटमध्ये येतात. त्यापेक्षा स्वस्तात Infinix नं ग्लोबल मार्केटमध्ये Infinix Zero Ultra 5G लाँच केला आहे. कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स टीज केले आहेत.

इनफिनिक्सच्या ट्विटनुसार Infinix Zero Ultra 5G मध्ये 180W थंडर चार्ज, 120Hz वॉटरफॉल डिस्प्ले आणि 200 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेन्सर मिळेल. कंपनीनं यात MediaTek च्या Dimensity 920 चिस्पेटचा वापर केला आहे. तसेच कंपनीनं या स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती देखील दिली आहे, चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. हे देखील वाचा: Jio 5G Launch: दसऱ्याचा मुहूर्त ठरला! उद्या येतंय 1Gbps स्पीडसह JIO 5G; देशातील 4 शहरांना मिळणार पहिला मान

200MP Camera 180W Fast Charging Smartphone Infinix Zero Ultra 5G Launched Price Specifications

Infinix Zero Ultra 5G चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता, Infinix Zero Ultra 5G मध्ये 6.8 इंचाचा 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे. इनफिनिक्सचा लेटेस्ट स्मार्टफोन Android 12 आधारित XOS 12 वर चालतो.

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 SoC ची पावर देण्यात आली आहे, तर ग्राफिक्ससाठी Mali G68 जीपीयू आहे. जोडीला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 5GB अतिरिक्त रॅम मिळवता येईल, म्हणजे गरज पडल्यास एकूण 13GB रॅमची ताकद मिळेल.

200MP Camera 180W Fast Charging Smartphone Infinix Zero Ultra 5G Launched Price Specifications

पावर बॅकअपसाठी यात 180W थंडर चार्जसह 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. यात ड्युअल , स्टँडर्ड आणि फ्यूरियस असे चार्जिंग मोड मिळतात. कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस, ब्लूटूथ, 3.5mm ऑडिओ जॅक यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय 6 आणि 5जी असे ऑप्शन मिळतात.

इनफिनिक्सच्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा आहे जो OIS सपोर्ट असलेला एक 1/1.22 इंच सेन्सर आहे. जोडीला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळतो. यातील 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो.

200MP Camera 180W Fast Charging Smartphone Infinix Zero Ultra 5G Launched Price Specifications

Infinix Zero Ultra 5G ची किंमत आणि उपलब्धता

Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट जागतिक बाजारात आला आहे. या मॉडेलमध्ये 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळेल. हा व्हेरिएंट 520 डॉलर्समध्ये विकत घेता येईल, ही किंमत भारतीय चलनात रूपांतरित केल्यास्त सुमारे 42,400 रुपये होतात. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेटमध्ये शानदार 2K डिस्प्ले; 8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Redmi Pad ची भारतात एंट्री

कलर ऑप्शन म्हणून Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोन Coslight Silver आणि Genesis Noir या दोन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील आहे, भारतात हा फोन आल्यानंतर यात बदल होऊ शकतो, परंतु कंपनीनं भारतातील उपलब्धतेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here