Categories: बातम्या

Samsung Galaxy A55 आणि Galaxy A35 चे रेंडर लाँचच्या आधी लीक, पाहा फोनचा लूक

Highlights
  • फोन एकदम रियल दिसणारा फोटा समोर आला आहे.
  • गॅलेक्सी ए55 फोनमध्ये 6.5 इंच सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो.
  • डिव्हाइसमध्ये 12GB रॅम +256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.


सॅमसंग काही दिवसामध्ये आपल्या ए-सीरीज स्मार्टफोन प्रोडक्ट पोर्टफोलियो पुढे आणू शकतो. यात Samsung Galaxy A55 आणि Samsung Galaxy A35 बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन्ही डिवाइस काही दिवसांपासून सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसत आहे. तसेच, आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचे एकदम रियल दिसणारे फोटो समोर आले आहेत. ज्यामुळे याची लाँच जवळ येत असल्याचे वाटत आहे. चला, पुढे तुम्हाला डिजाइन आणि मोबाइलच्या संभावित स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy A55 आणि Galaxy A35 चे रेंडर (लीक)

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर प्रमुख टिपस्टर इवान ब्लास नं Samsung Galaxy A55 आणि Galaxy A35 चे रेंडर आणि कलर ऑप्शन शेअर केले आहेत.
  • तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता Galaxy A55 आणि Galaxy A35 तीन कलरमध्ये समोर आला आहे.
  • दोन्ही फोन्सची डिजाइन जवळपास समान आहे, यात फ्रंटला पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • दोन्ही डिव्हाइसच्या बॅक पॅनलवर एलईडी-फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिसून येत आहे.
  • फोन्समध्ये वॉल्यूम आणि पावर बटन असलेला भागा थोडा वरती असलेला वाटत आहे.
  • अपेक्षा आहे की Samsung Galaxy A35 प्लास्टिकपासून बनविले असू शकते, तर Samsung Galaxy A55 मेटलचा ठेवला जाऊ शकतो.
  • कलर ऑप्शन पाहता दोन्ही फोन ऑसम आइसब्लू, ऑसम लिलैक आणि ऑसम नेवी मध्ये पाहिले गेले आहेत.

Samsung Galaxy A55 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी ए55 फोनमध्ये 6.5-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. या स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास 5 का प्रोटेक्शन दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
  • प्रोसेसर: डिव्हाइसमध्ये परफॉरमेंससाठी Exynos 1480 प्रोसेसर आणि Xclipse 530 GPU लावला जाऊ शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत 12GB पर्यंत रॅम आणि 128GB व 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट मिळू शकतो.
  • कॅमेरा: गॅलेक्सी A55 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिसला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत डिव्हाइसमध्ये फोनला चालविण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.
  • ओएस: हा मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित वनयुआय वर काम करु शकतो.

Samsung Galaxy A35 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: Samsung Galaxy A35 5G मध्ये 6.6 इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले लावला जाऊ शकतो. ह्यावर 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: हा डिव्हाइस एक्सिनॉस 1380 चिपसेटसह ठेवले जाऊ शकते. हि माहिती बेंच मार्किंग लिस्टिंगनुसार समोर आली आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत हा डिव्हाइस पण 12GB पर्यंत रॅम आणि 128GB व 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करु शकतो.
  • कॅमेरा: Samsung Galaxy A35 5G मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तर मागे OIS सह 50 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स दिला जाऊ शकते.
  • बॅटरी: फोनमध्ये युजर्सना 5000mAh बॅटरी आणि चार्जिंगसाठी 25 वॉट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
  • ओएस: Samsung Galaxy A35 5G पण लेटेस्ट अँड्रॉइड 14 वर काम करु शकतो.
Published by
Kamal Kant