साल 2021 मोबाईल टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात 5G साठी सुवर्णकाळ म्हणता येईल. वर्षाच्या सुरवातीला अनेक टेक ब्रँड्स व मोबाईल कंपन्यांनी आपले 5जी स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. महाग डिवायस पासून मिड रेंज सेग्मेंट मध्ये पण 5G स्मार्टफोन येऊ लागले आहेत आणि आगामी काळात 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये पण 5जी फोन उपलब्ध होण्याची आशा आहे. यात आता Nokia चे नाव पण जोडले गेले आहे. HMD Global ने अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात अफॉर्डेबल 5जी स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
Nokia ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी HMD Global ने सांगितले आहे कि कंपनी भारतात अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन घेऊन येण्याची योजना बनवत आहे. फिनिश कंपनीचे वाइस प्रेजिडेंट संमीत कोचर यांनी फाइनेंशियल एक्सप्रेसला दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये म्हटले आहे कि सोर्सिंगपासून विक्री पर्यंत भारत एक महत्वपूर्ण बाजार आहे आणि कंपनी इथे कमी किंमत असलेल्या 5जी स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची योजना करत आहे. संमीत यांनी सांगितले आहे कि Google, Qualcomm आणि Nokia Technologies यांची 230 मिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक पण झाली आहे.
हे स्मार्टफोन्स होऊ शकतात लॉन्च
एचएमडी ग्लोबल किंवा नोकियाने आता आगामी 5जी मोबाईल फोन्सची नावे तर समोर आली नाहीत पण काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार कंपनीने चार नवीन 5G स्मार्टफोन्सवर काम करत आहे जो लवकरच मार्केट मध्ये येईल. या स्मार्टफोन्स मध्ये Nokia 5.5 5G, Nokia 7.4 5G, Nokia 8.4 5G आणि Nokia 9.x PureView चा समावेश असू शकतो. पण असे बोलले जात आहे कि कदाचित स्मार्टफोन बाजारात अजून काही नावाने येतील.
हे देखील वाचा : Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE येत आहे भारतात, वेबसाइटवर झाला लिस्ट
तसेच मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी पहिल्या सहामाहीत दोन स्मार्टफोन लॉन्च करेल आणि Nokia 7.4 5G यातील एक मोबाईल फोन असू शकतो. सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 480 SoC सह येईल जो अलीकडेच सादर केला गेला होता. नोकिया क्विकसिल्वर कोडनेमसह HMD ग्लोबलचा एक स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर पण लिस्ट झाला आहे.
लिस्टिंग वरून समजले आहे कि स्मार्टफोन 6GB रॅम आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर केला जाईल. स्मार्टफोन 1.8GHz चिपसेटवर काम करेल ज्याचे नाव देण्यात आले नाही. फोनला सिंगल-कोरसाठी 466 आणि मल्टी-कोरसाठी 1487 – पॉईंट्स मिळाले आहेत. या स्कोर वरून अंदाज लावला जात आहे कि नोकिया क्विकसिल्वर एका बजेट प्रोसेसरसह सादर केला जाईल. आशा आहे कि फोन नवीन स्नॅपड्रॅगॉन 480 5जी चिपसेट दिला जाऊ शकतो.















