ह्युमन मोबाईल डिव्हाईस (HMD) ने भारतात तिसरा स्मार्टफोन HMD Skyline लाँच केला आहे. हा बॅक कव्हर बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह येतो. यामध्ये ॲप्स, नेव्हिगेशन आणि एआय-पॉवर्ड असिस्टंट पर्यंत लवकर जाण्यासाठी कस्टम बटण देखील आहे. तुम्हाला सांगतो की या फोनला जुलैमध्ये जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळाला होता. यामध्ये या व्हर्जन प्रमाणेच स्पेसिफिकेशन आणि डिझाईन आहे. चला, पुढे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत यांची माहिती तपशीलवारपणे जाणून घेऊया.
HMD Skyline ची किंमत आणि उपलब्धता
- HMD Skyline स्मार्टफोन भारतात 12 जीबी रॅम + 256 जीबी मेमरी सह लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत 35,999 रुपये आहे.
- हा फोन 17 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून Amazon.in, HMD.com आणि इतर रिटेल स्टोअर्सवर विकला जाईल.
- डिव्हाईससाठी ट्विस्टेड ब्लॅक आणि निऑन पिंक असे दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असतील.
- लाँच ऑफरचा भाग म्हणून ग्राहकांना मोफत 33 वॉट टाईप सी फास्ट चार्जर देण्यात येत आहे.
HMD Skyline चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले: एचएमडी स्कायलाईन स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा 144हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर10 व्हिडिओ प्लेबॅक आणि स्टिरिओ स्पीकरसह एक जबरदस्त पीओएलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. जो लहान रिल्सपासून ते उच्च दर्जाच्या गेमिंगपर्यंत उत्तम अनुभव देण्यास सक्षम आहे.
चिपसेट: एचएमडी स्कायलाईन मोबाईलमध्ये ब्रँडने क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 चिपसेट लावला आहे. हा उत्कृष्ट प्रदर्शन आणि मल्टीटास्किंग करण्यासाठी चांगला आहे. या चिपसह वापरकर्त्यांना 2.4 गिगाहर्ट्झ पर्यंतची उच्च क्लॉक स्पीड मिळेल.
स्टोरेज आणि रॅम: स्पीड आणि डेटा सेव्ह करण्यासाठी कंपनीने 12 जीबी पर्यंत रॅम + 256 जीबी पर्यंतचे इंटरनल स्टोरेज ऑफर केले आहे.
कॅमेरा: ह्यूमन मोबाईल डिव्हाईसने स्कायलाईनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सेलचा ओआयएस असलेला प्रायमरी, 50 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आणि 13 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाईड लेन्स उपलब्ध आहे. तर, रिल्स बनवण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी ब्रँडने 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. यामध्ये तुम्हाला कॅप्चर फ्यूजन, 4x ऑप्टिकल झूम, सेल्फी जेश्चर, बोकेह, पोर्ट्रेट मोड असे अनेक फिचर्स मिळतील.
बॅटरी आणि चार्जिंग: एचएमडीने स्कायलाईन मध्ये 4,600 एमएएच ची बॅटरी वापरली आहे. तिला चार्ज करण्यासाठी 33 वॉटचे फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. ब्रँडचा दावा आहे की फोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 48 तासांपर्यंत चालू शकते. 800 पूर्ण चार्जिंग सायकलनंतरही ते त्याच्या मूळ क्षमतेच्या किमान 80 टक्के राखून ठेवते. ही 800 पूर्ण चार्जिंग चक्रानंतर ही त्याच्या मूळ क्षमतेच्या किमान 80 टक्के राखून ठेवते. इतकेच नाही तर ते कोणत्याही चुंबकीय Qi2 चार्जरसह वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करते.
इतर: एचएमडी स्कायलाईन मध्ये जेन 2 रिपेअरेबिलिटी ची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे मागील कव्हर खोलण्यासाठी फक्त एक स्क्रू वापरून त्याची घरी दुरुस्ती करणे सोपे होते. एचएमडीची दुरुस्तीयोग्यतेसाठी बांधिलकी एचएमडीची स्कायलाईनसह कायम आहे. तुम्हाला सांगतो हे तंत्रज्ञान जेन Z च्या अशा 45 टक्के वापरकर्त्यांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे की ज्यांना सहजपणे दुरुस्त करता येणारे डिव्हाईस आवडतात.
ऑपरेटिंग सिस्टम: हा डिव्हाईस अँड्राईड 14 सह येतो. यात 2 वर्षांची ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड आणि 3 वर्षांचे सुरक्षा अपग्रेड देखील मिळतील.














