Home Featured सोप्पे आहे Whatsapp मधील सीक्रेट चॅट लपवणे, फॉलो करा या स्टेप्स

सोप्पे आहे Whatsapp मधील सीक्रेट चॅट लपवणे, फॉलो करा या स्टेप्स

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp अनेक शानदार फीचर्स सह येतो. यातील काही फीचर्स तर तुम्हाला कदाचित माहित नसतील. या फीचर्समुळे चॅटिंग करणे सोप्पे होते. तसेच या इन्स्टंट मेसेजिंग ऍप मध्ये आपल्या काही अश्या पर्सनल चॅट्स असतात ज्या इतरांनी वाचू नये असे आपल्याला वाटते. याचे उत्तर पण वॉट्सऍप मधेच आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स आपले सीक्रेट चॅट डिलीट न करता Whatsapp चॅट लपवू शकतात.

यूजर्सना आपल्या पर्सनल वॉट्सऍप चॅट लपवण्यासाठी थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करण्याची पण गरज नाही. वॉट्सऍप मधेच असे फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही चॅट सहज लपवू शकता. हे फीचर अनेकांना माहित असते पण वापर खूप कमी लोक करतात.

अशी आहे ट्रिक:

आम्ही तुम्हाला वॉट्सऍप मध्ये ज्या फीचरचा वापर करण्यास सांगत आहोत त्याचे नाव आहे Archive चॅट्स. या फीचरच्या मदतीने तुम्ही वॉट्सऍप चॅट मेन स्क्रीन वरून बाजूला काढू शकता. तसेच असे केल्यावर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा ती चॅट पुन्हा परत आणू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही ग्रुप आणि पर्सनल दोन्ही चॅट लपवू शकता.

1. सर्वात आधी जी चॅट लपवायची आहे त्यावर थोडावेळ टच करून ठेवा.

2. वर तुम्हाला तीन पर्याय दिसतील ज्यात चॅट पिन, म्यूट आणि आर्काइव असेल. यातील शेवटचा आर्काइव पर्याय निवडा.

3. या ऑप्शन वर टॅप करताच चॅट होम स्क्रीन वरून गायब होईल.

अश्याप्रकारे परत आणा चॅट

1. आर्काइव चॅट्स स्क्रीनच्या खाली दिसेल. स्क्रोल करत सर्वात खाली जा.

2. इथे तुम्हाला Archived चा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.

3. टॅप केल्यानंतर Unarchive चा ऑप्शन दिसेल, ज्या नंतर चॅट परत स्क्रीन वर येईल.

Note: आम्ही या स्टेप्स एंडरॉयड फोन मध्ये वापरल्या आहेत.