Home बातम्या जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट आहे भारतात, 2019 पर्यंत होतील 60 कोटींपेक्षा जास्त यूजर्स

जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट आहे भारतात, 2019 पर्यंत होतील 60 कोटींपेक्षा जास्त यूजर्स

भारतीय टेलीकॉम सेक्टर मध्ये कमी किंमतीत चांगला डेटा मिळत असल्यामुळे आज भारतात इंटरनेटची वाढ जोरात होत आहे. याचे श्रेय जियो, वोडाफोन आइडिया, एयरटेल आणि इतर टेलीकॉम कंपन्यांच्या कमी किंमतीतील चांगल्या डेटा ऑफर्सना जाते. एक रिपोर्टनुसार बोलले जात आहे कि यावर्षी म्हणजे 2019 च्या शेवटपर्यंत देशात इंटरनेट यूजर्सची संख्या 62.7 कोटीच्या पार जाईल. गेल्यावर्षीचे आकडे पाहता त्यावेळी संख्या 56.6 कोटी होती. एका नव्या रिपोर्ट मधून हि माहिती समोर आली आहे.

ग्रामीण भागात आहेत 25.1 कोटी इंटरनेट यूजर्स
मार्केट रिसर्च कंपनी कंतार आईएमआरबी ने एक रिपोर्ट जाहीर केला आहे. ज्यानुसार, साल 2018 मध्ये इंटरनेट यूजर्सच्या संख्येत 7 टक्कयांची वाढ दिसली होती. तर ग्रामीण भारतात 35 टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. एक अनुमान आहे कि ग्रामीण भारतात 25.1 कोटी इंटरनेट यूजर्स आहेत आणि हि संख्या 2019 च्या शेवटापर्यंत 29 कोटी होऊ शकते.

पीएम मोदींनी सादर केला वन नेशन वन कार्ड, सामान्य जनतेला मिळतील हे फायदे

यामुळे वाढले इंटरनेट यूजर्स
कंतार आईएमआरबी चे मीडिया व डिजिटल प्रबंधक हेमंत मेहता म्हणले, ‘डिजिटल क्रांती आता मोठ्या शहरांसोबत छोट्या गावांमध्ये पण पसरत आहे हि एक चांगली बाब आहे त्यामागील कारण स्वस्तात उपलब्द झालेला इंटरनेट डेटा आहे.’ अलीकडे भारतीय टेलीकॉम सेक्टर मध्ये कमी किंमतीती चांगला डेटा प्लान देण्याची स्पर्धा सुरु झाली आहे हे नाकारता येणार नाही. आज भारतीय मोबाईल यूजर्सकडे अनेक ऑप्शन आहेत, ज्यामुळे इंटरनेट गावांपर्यंत पोहचत आहे. या रिपोर्ट मध्ये भारतातील 57 मोबाईल डेटा प्लानची तुलना करण्यात आली आहे. यांची सरासरी किंमत 0.26 डॉलर (अंदाजे 18.5 रुपये) आहे. सर्वात स्वस्त प्लान मध्ये 1 जीबी डेटाची किंमत फक्त 0.02 डॉलर (1.75 रुपये) आहे. हि तुलना 11 सप्टेंबर, 2018 च्या दर घेऊन करण्यात आली आहे.

इतर देशांपेक्षा कमी भारतात मोबाईल डेटाची किंमत
भारतात मोबाईल डेटाच्या किंमती जगभरातील इतर देशांपेक्षा सर्वात स्वस्त आहेत. काही आकड्यांनुसार, गाव आणि शहरांमध्ये गेल्यावर्षी इंटरनेट यूजर्सच्या संख्येत झालेल्या वाढीच्या बाबतीत बिहार 35 टक्के वाढीसह सर्वात वर आहे. तसेच इतर राज्यांत पण वेगाने इंटरनेट यूजर्सची संख्या वाढली आहे. देशात इंटरनेटचा वापरणाऱ्या महिलांची संख्या 42 टक्के आहे. खास बाब अशी कि त्या इंटरनेट वर पुरुषांइतकाच वेळ घालवतात.

दोन दिवस फ्लिपकार्ट वर 19,000 रुपयांपर्यंत स्वस्तात मिळतील स्मार्टफोन, बघा कसे घ्यावे विकत

जियोची महत्वाची भूमिका
देशात मोबाईल डेटाचे दर जियो लाँन्च झाल्यानंतर खूप कमी झाले आहेत आणि हे नाकारता येणार नाही. रिलायंस जियो ने 5 सप्टेंबर, 2016 ला भारतीय बाजारात पाऊल टाकले, ज्यानंतर इंटरनेटचे दार कमी झाले. याआधी भारतात 1जीबी 3जी डेटा साठी सरासरी 250 ते 300 रुपये प्रति महिना द्यावे लागत होते. 2जी दर तेव्हा 100 रुपये महिना होते. जियो आल्यानंतर एयरटेल, आइडिया आणि वोडाफोन सारख्या ऑपरेटर्सनी पण मोबाईल डेटाचे दर कमी केले. आज फक्त 150 रुपयांच्या बेस किंमतीत यूजर्सना 1.5जीबी 4जी डेटा मिळत आहे.