दोन दिवस फ्लिपकार्ट वर 19,000 रुपयांपर्यंत स्वस्तात मिळतील स्मार्टफोन, बघा कसे घ्यावे विकत

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आपल्या कस्टमर्सना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक मोठ्या निमित्ताला सेलचे आयोजन करते, ज्यात अनेक स्मार्टफोन्स आणि एक्सेससरीज वर आकर्षक डिस्काउंट दिला जातो. यावेळी फ्लिपकार्टने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यूजर्स साठी फ्लिपकार्ट वूमेन डे सेलचे आयोजन केले आहे.

जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्चला साजरा केला जातो. पण फ्लिपकार्ट आयोजित सेल महिला दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे 7 मार्च (आज) पासून सुरु होईल जो 8 मार्च महिला दिनापर्यंत चालेल. आज पासून सुरु होणाऱ्या सेल मध्ये जर तुम्ही आपल्या आईला, बहिणीला, पत्नी किंवा एखाद्या मैत्रिणीला भेट म्हणून मोबाईल फोन देऊ इच्छित असाल तर हा सेल तुमच्यासाठी आहे.

स्मार्टफोन्स व्यतिरिक्त फ्लिपकार्ट वूमेन डे सेल मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीज वर 80 टक्के सूट दिली जाईल. तसेच टीवी आणि इतर होम एप्लायंस वर 75 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. आम्ही तुम्हाला इथे स्मार्टफोन वर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला फोन विकत घेताना जास्त त्रास होणार नाही. फ्लिपकार्ट वरील या सेल मध्ये प्रत्येक तासाला ओएमजी डील, दार आठ तासांनी ब्लॉकबस्टर डील आणि प्राइस क्रश सेल होईल. तसेच या सेल मध्ये नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन, डेबिट कार्ड वापरून ईएमआई चा ऑप्शन पण मिळेल.

पीएम मोदींनी सादर केला वन नेशन वन कार्ड, सामान्य जनतेला मिळतील हे फायदे

या सेल मध्ये रियलमीच्या फोन वर डिस्काउंट दिला जात आहे, ज्यात रियलमी 2 प्रो आणि रियलमी सी1 फोनचा समावेश आहे. सेल मध्ये रियलमी 2 प्रो 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनची किंमत 14,990 रुपये आहे. तसेच रियलमी सी1 चा 3जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल तुम्ही 8,999 रुपयांच्या ऐवजी 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तसेच हॉनर चे स्मार्टफोन हॉनर 9एन, 9लाइट आणि 7ए वर पण सूट दिली जात आहे. हॉनर 9एन चा 4जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल 9,999 रुपयांमध्ये मिळेल. याची ओरिजनल किंमत 15,999 रुपये आहे. तर 3जीबी आणि 32जीबी वेरिएंट 8,999 रुपयांना मिळेल.

48-एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाले ओपो एफ11 प्रो आणि एफ11, स्टाईलिश लुक सह मिळतील ताकदवान स्पेसिफिकेशन

त्याचबरोबर हॉनर 9 लाइट चा 3जीबी आणि 32जीबी वेरिएंट 7,999 रुपये व 4जीबी व 64जीबी वेरिएंट 10,999 रुपयांना मिळेल. तर हॉनर 7ए चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सेल मध्ये वीवो वी9 प्रो चा 4जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याची ओरिजनल किंमत 17,990 रुपये आहे.

फ्लिपकार्टच्या वूमेन डेज सेल मध्ये नोकिया 6.1 प्लस चा 4जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर नोकिया 5.1 प्लस चा 3जीबी रॅम वेरियंट 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. याची ओरिजनल किंमत 13,199 रुपये आहे.

फ्लिपकार्टच्या या सेल मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस8 फक्त 30,990 रुपयांमध्ये मिळेल. जो भारतात लाँन्चच्या वेळी 57,900 रुपयांमध्ये उपलब्द झाला होता. हिशोब केल्यास सॅमसंग गॅलेक्सी एस8 वर पहिल्यांदा शानदार सूट दिली जात आहे. या सेल मध्ये 12,990 रुपयांच्या बेस किंमतीती लॅपटॉप विकत घेता येईल. तसेच टॅबलेट या सेल मध्ये 2,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here