Home बातम्या 8GB रॅमसह वेबसाइटवर लिस्ट झाला अपकमिंग लो बजेट असलेला फोन, लवकरच करेल बाजारात एंट्री

8GB रॅमसह वेबसाइटवर लिस्ट झाला अपकमिंग लो बजेट असलेला फोन, लवकरच करेल बाजारात एंट्री

इंफीनिक्स आपल्या शानदार एंट्री लेवल स्मार्टफोनसाठी खूप फेमस आहे आणि वेळोवेळी दमदार फीचर्ससह आपले लो बजेट फोन्स सादर करत असते. आता माहिती समोर आली आहे कि कंपनी आपल्या ‘नोट’ सीरीजमध्ये एक नवीन फोन Infinix Note 10 Pro मार्केट मध्ये घेऊन येण्याची तयारी करत आहे. Infinix Note 10 Pro बेंचमार्किंग साइट Geekbench वर स्पॉट केला गेला आहे, ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. याआधी फोन FCC वर पण मॉडेल नंबर X695 सह दिसला होता. (infinix note 10 pro appears on geekbench with 8gb ram launch soon)

गीकबेंच लिस्टिंग पाहता फोनला सिंगल-कोर मध्ये 433 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 1125 स्कोर मिळाले आहेत. तसेच लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि Infinix Note 10 Pro MediaTek Helio G90T, 8GB RAM आणि Android 11 OS सह सादर केला जाईल. दुसरीकडे एफसीसी लिस्टिंग मध्ये असा खुलासा झाला होता कि Infinix Note 10 Pro 8GB/256GB स्टोरेज ऑप्शन व डुअल-बॅंड Wi-Fi सह 33W फास्ट-चार्जिंगला सपोर्टवर लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : 12GB रॅम आणि सर्वात पावरफुल प्रोसेसरसह वेबसाइटवर लिस्ट झाला OPPO Find X3 Pro, लॉन्च आला जवळ

इतकेच नव्हे तर FCC डॉक्यूमेंट मध्ये एक स्केच शेअर करण्यात आले होते, ज्यात फोनच्या डिजाइनची झलक दिसली होती. या स्केचनुसार फोनच्या मागे आयताकृती क्वाड कॅमेरा असेल. पण, फ्रंट लुक बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.

इंफीनिक्सने गुरुवारी भारतात आपला लो-बजेट असलेला Infinix Smart 5 पहिल्यांदा विक्रीसाठी सादर केला होता. फोन 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो आणि याची किंमत 7,199 रुपये आहे. या फोन मध्ये मीडियाटेक हीलियो G25 SoC देण्यात आला आहे. अँड्रॉइड 10 वर बेस्ड XOS 7 UI वर काम करणाऱ्या या फोनची मेमरी माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : 5G नव्हे तर 4G नेटवर्कसह भारतात येत आहे POCO X3 Pro, मार्चमध्ये ‘या’ दिवशी होईल लॉन्च!

फोटोग्राफीसाठी यात क्वॉड एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा ड्यूल AI रियर कॅमेरा आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी पाहता या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मिळते.