OPPO Find X3 सीरीज मार्च मध्ये सादर होण्याची बातमी समोर येत आहे. या सीरीजमध्ये कंपनीद्वारे Find X3 आणि Pro मॉडेल सादर केले जातील अशी बातमी आहे. अजूनतरी कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. त्याचबरोबर काही आठवड्यांपूर्वी OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स Geekbench वर स्पॉट केले गेले होते. आता OPPO Find X3 Pro चे स्पेसिफिकेशन्स बेंचमार्किंग साइटवर समोर आले आहेत. लिस्टिंगनुसार OPPO Find X3 Pro या सीरीजचा हाई-एन्ड फ्लॅगशिप मॉडेल असेल. (oppo find x3 pro listed on geekbench with 12gb ram launch soon)
OPPO Find X3 Pro चे स्पेसिफिकेशन्स
बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर फोन OPPO PEEM00 मॉडेल नंबरसह दिसला आहे. लिस्टिंगनुसार फोन 12GB रॅमसह येईल. आशा आहे कि हा डिवाइसचा टॉप वेरिएंट असेल, ज्यात 256GB ची स्टोरेज दिली जाईल. तसेच फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. याआधी Find X3 Pro बेंचमार्किंग साइट गीकबेंच 5 आणि AnTuTu वर दिसला होता.
हे देखील वाचा : लो बजेट मध्ये Motorola चा नवीन डाव, फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी असलेला Moto E7 Power
डिवाइसला सिंगल-कोर मध्ये 952 पॉईंट आणि मल्टी-कोर मध्ये 3154 स्कोर मिळाले आहेत. तसेच लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन Snapdragon 888 चिपसेटसह येईल, ज्याचा क्लॉक स्पीड 1.80 GHz असेल.
आतापर्यंत समोर आलेले रिपोर्ट्स
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार ओपो फाइंड एक्स 3 प्रो मध्ये 6.67 इंचाचा क्यूएचडी + डिस्प्ले असू शकतो, ज्यात 120Hz पर्यंतचा एडाप्टिव रिफ्रेश रेट आणि 50 मेगापिक्सलच्या प्राइमरी सोनी सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. त्याचबरोबर फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी असल्याची बातमी पण समोर येत आहे जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येईल. ओपो नवीन फाइंड एक्स 3 सीरीज मार्च मध्ये लॉन्च करेल, त्यामुळे आपल्याला किंमतीसह सर्व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी जास्त वाट बघावी लागणार नाही.
हे देखील वाचा : FASTag बद्दल तुम्हाला पण समस्या आहे का? तर मग फक्त 10 पॉईंट्स मध्ये जाणून घ्या त्यांची उत्तरे
या सीरीज मध्ये Oppo Find X3, Oppo Find X3 Pro, Oppo Find X3 Neo आणि Oppo Find X3 Lite सारखे फोन्स सादर केले जाऊ शकतात. आता लॉन्चच्या आधी या फाइंड एक्स3 सीरीजचा एक अपकमिंग ओपो फाइंड एक्स3 चे स्पेसिफिकेशन्स डीटेल बेंचमार्क साइट्सवर लीक झाले आहेत.