Infinix कंपनीने गेल्या काही दिवसांत आपल्या ‘हॉट 10’ सीरीजअंतगर्त तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात Infinix Hot 10S, Infinix HOT 10S NFC एडिशन आणि Infinix HOT 10T चा समावेश आहे. हि सीरीज अजूनही भारतात आली नाही. परंतु भारतात येण्यापूर्वी कंपनीने आज या सीरीज अंतगर्त अजून दोन नवीन मोबाईल फोन Infinix Note 10 तसेच Infinix Note 10 Pro पण लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन लो बजेटमध्ये सादर झाले आहेत जे शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतात. चला जाणून घेऊया या दोन्ही नवीन स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास. (Infinix Note 10 Pro official specs features price sale offer)
Infinix Note 10 Pro
इनफिनिक्स नोट 10 प्रो बद्दल बोलायचे झाले तर हा मोबाईल फोन 1080 × 2460 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.95 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च झाला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च झाला आहे जो एक्सओएस 7.6 सह आक्टाकोर प्रोसेसर तसेच 12एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी95 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी76 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन डुअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी Infinix Note 10 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा पोर्टरेट लेंस आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Nubia लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन Red Magic 6R, जाणून घ्या याची वैशिष्टये
Infinix Note 10
इनफिनिक्स नोट 10 पाहता हा फोन पण 1080 × 2460 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.95 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्यात 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित एक्सओएस 7.6 वर लॉन्च झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसरसह 12एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी56 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन पण डुअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.
Infinix Note 10 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : Asus ने आणला अनोखा फ्लिप कॅमेरा असलेला ZenFone 8 Flip, डिजाइन करेल तुम्हाला हैराण
वेरिएंट व प्राइस
Infinix Note 10 Pro 8GB RAM सह 256GB storage वर लॉन्च केला गेला आहे आणि या फोनची किंमत भारतीय करंसीनुसार 19,000 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Black, Nordic Secret आणि Purple कलरमध्ये बाजारात आला आहे. Infinix Note 10 ने 6GB RAM + 128GB storage सह मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे आणि या फोनची किंमत 14,500 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Black, Emerald Green आणि Purple कलरमध्ये लॉन्च केला गेला आहे.
