Infinix Note 40 Pro लवकर होऊ शकतो लाँच, ब्लूटूथ एसआयजी साइटवर झाला लिस्ट

Highlights

 • Infinix Note सीरीज लवकर सादर केली जाऊ शकते.
 • यात Note 40 Pro डिवाइस येऊ शकतो.
 • स्मार्टफोनचा मॉडेल नंबर X6850 समोर आला आहे.

इंफिनिक्स आपल्या नोट 30 सीरीजच्या यशानंतर याच्या अपग्रेडच्या रूपामध्ये Note 40 सीरीजवर काम करत आहे. आशा केली जात आहे की, Infinix Note 40 Pro डिवाइस लवकरच बाजारात एंट्री घेऊ शकतो. ज्याला सध्या ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आले आहे. चला, पुढे लिस्टिंग आणि मोबाइलबाबत सर्वकाही माहिती जाणून घेऊया.

Infinix Note 40 Pro ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंग

 • Infinix Note 40 Pro स्मार्टफोन X6850 मॉडेल नंबरसह ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर समोर आला आहे.
 • डिवाइसचा डिक्लेरेशन आयडी D065235 दिसत आहे.
 • हे पण सांगण्यात आलं आहे की नवीन Infinix Note 40 Pro मध्ये ब्लूटूथ 5.3 टेक्नॉलॉजी दिली जाईल.
 • तसेच या वेबसाइटवर आल्यानंतर असे वाटत आहे की नवीन फोन डिसेंबर आणि जानेवारीमध्ये एंट्री घेऊ शकतो.

Infinix Note 30 Pro चे स्पेसिफिकेशन्स

याआधी मे आणि जून मध्ये ब्रँड नं इंफिनिक्स नोट 30 सीरीजमध्ये पाच स्मार्टफोन सादर केले होते ज्यात नोट 30, नोट 30 5जी, नोट 30 प्रो, नोट 30 विआयपी आणि नोट 30i चा समावेश आहे. तसेच, आता नोट 40 सीरीजमध्ये पण हे मॉडेल येण्याची शक्यता आहे. चला, पुढे जाणून घेऊया Note 30 Pro चे स्पेसिफिकेशन्स …

 • डिस्प्ले: इंफिनिक्स नोट 30 प्रो मोबाइलमध्ये 6.67 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतो.
 • प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक हेलिओ जी99 चिपसेट सादर करण्यात आली आहे. हा 6 नॅनोमीटर प्रक्रिया वर चालतो तसेच याची प्रायमरी क्लॉक स्पीड 2.2GHz ची आहे.
 • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता डिव्हाइसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलचे आणखी लेन्स आहेत. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
 • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत इंफिनिक्स नोट 30 प्रो 5000mAh बॅटरी आणि 68वॉट फास्ट चार्जिंगसह 15वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आहे.
 • अन्य: Infinix Note 30 Pro मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 4G, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे अनेक फिचर्स मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here