Home बातम्या Infinix लाँच करू शकते 260W फास्ट चार्जिंग असलेला स्मार्टफोन; रिपोर्टमधून खुलासा

Infinix लाँच करू शकते 260W फास्ट चार्जिंग असलेला स्मार्टफोन; रिपोर्टमधून खुलासा

Infinix Zero Ultra

Highlights
  • Infinix 260W चा फास्ट चार्जर सादर करू शकते.
  • फास्ट चार्जरसह नवीन मोबाइल फोन लाँच होऊ शकतो.
  • हा फोन Infinix Zero Ultra सारखा दिसू शकतो.

इलेक्ट्रॉनिक बाजारात मोबाइल फोनचा चार्जिंग स्पीड वाढवण्याची चढाओढ सुरु झाली आहे. अलीकडेच Realme नं 240W फास्ट चार्जिंगसह Realme GT 3 जागतिक बाजारात सादर केला होता. तसेच रेडमीनं देखील एक व्हिडीओ शेयर करून 300W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दाखवली होती. आता बातमी आली आहे की चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix देखील 260W वायर फास्ट चार्जिंगसह फोन लाँच करण्याची तयारी करत आहे.

260W फास्ट चार्जिंग

GSM Arena च्या रिपोर्टनुसार, 260W च्या थंडर चार्ज चार्जरसह एक स्मार्टफोन एका फोटोत दिसला आहे. हा फोन Infinix Zero Ultra सारखा दिसत आहे, जो यंदा जानेवारीत सादर करण्यात आला होता. मिळेलल्या माहितीनुसार 260W के चार्जिंग सिस्टममध्ये चार 100W चार्ज पंपसह एक AHB (Advanced High-Performance Bus) सर्किट असू शकतो, जो स्मार्टफोन वेगानं चार्ज करण्यास मदत करू शकतो. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 बद्दल महत्वाची माहिती लीक; जाणून घ्या कधी येणार हा फोन

Infinix Zero Ultra

स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix 9 मार्चला 260W असलेला चार्जर लाँच करू शकते. त्याचबरोबर नवीन मोबाइल फोन देखील लाँच केला जाऊ शकतो, जो झिरो अल्ट्राचा अपग्रेडेड व्हर्जन असू शकतो. परंतु कंपनीनं अद्याप 260W फास्ट चार्जिंग किंवा नवीन स्मार्टफोनच्या लाँच बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

बाजारातील Infinix ZERO ULTRA चे स्पेसिफिकेशन

Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोन 6.8 इंचाच्या 3D कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा एक FHD+, रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोन Android 12 आधारित XOS 12 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 920 SoC आणि Mali G68 जीपीयू मिळतो. यात 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. हे देखील वाचा: 13 हजारांपेक्षा कमी किंमतीत 6,000mAh battery आणि 10.1-इंच डिस्प्ले; iTel PAD 1 4G टॅबलेट भारतात लाँच

Infinix Zero Ultra

फोनमध्ये मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जोडीला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला ड्यूल एलईडी फ्लॅशसह 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 180W थंडर चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. त्यामुळे हा फोन फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. हा फोन 32,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.