
एकेकाळी फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणाऱ्या चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus नं गेल्या काही वर्षांपासून आपली रणनीती बदलली आहे. कंपनीनं बजेट आणि मिडरेंज मधील सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नॉर्ड सीरिज सादर केली आहे. या सीरिजमधील OnePlus Nord CE 2 ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या फोनचा उत्तराधिकारी OnePlus Nord CE 3 बाजारात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
टेक वेबसाइट मायस्मार्टप्राइसनं टिपस्टर ऑनलिक्सच्या हवाल्याने कथित OnePlus Nord CE 3 च्या लाँच टाइमलाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. त्यानुसार हा फोन 2023 च्या उत्तरार्धात सादर केला जाईल. आता आलेले वनप्लस नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन याआधी आलेल्या लिक्सपेक्षा कितीतरी वेगळे आहेत. रिपोर्टनुसार हा फोन फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले, 80वॉट फास्ट चार्जिंग आणि 256जीबी स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Jio, Vi की Airtel कोण देतंय 296 रुपयांमध्ये जास्त फायदे; 30 दिवसांच्या वैधतेसाठी कोणाची करावी निवड
कधी येणार OnePlus Nord CE 3
टेक वेबसाइटच्या रिपोर्टनुसार वनप्लस नॉर्ड सीरिजचा हा आगामी स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 यावर्षी जुलैच्या आसपास सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे यंदा जुलैच्या आसपास नॉर्ड 3 देखील लाँच केला जाऊ शकतो. वनप्लस नॉर्ड सीई 3 एक मिडरेंज स्मार्टफोन असू शकतो आणि गेल्यावर्षी आलेल्या वनप्लस नॉर्ड सीई 2 ची जागा घेऊ शकतो.
OnePlus Nord CE 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
- 6.72” FHD+ AMOLED display
- Snapdragon 782G processor
- 12GB RAM and 256GB storage
- 50MP triple rear camera
- 5000mAh battery, 80W fast charging
वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन 2400 X 1080 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120हर्ट्झ असू शकतो. याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं की हा फोन आयपीएस एलसीडी स्क्रीनसह येऊ शकतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 782जी प्रोसेसरची ताकद दिली जाऊ शकते, जोडीला 8जीबी/12जीबी रॅम आणि 128जीबी/256जीबी स्टोरेज मिळू शकते.
वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Honda नं सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स, सिंगल चार्जमध्ये मिळेल जबरदस्त रेंज
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5जी, 4जी, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप सी पोर्ट मिळू शकतो. तसेच सिक्योरिटीसाठी हा फोन इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. यातील 5000 एमएएचची बॅटरी 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. वनप्लस नॉर्ड सीई 3 ची आणखी माहिती लवकरच हाती लागू शकते.















