Realme 13 Pro 5G सीरीजची डिझाईन ब्रँडने केली कंफर्म, पाहा लूक

रियलमीच्या नंबर सीरीजमध्ये आता 13 जोडणार आहे. यानुसार ब्रँड 13 प्रो सीरीजमध्ये Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro Plus 5G स्मार्टफोन लाँच करेल. कंपनीने काही दिवसांपू्र्वी फोनचे लाँच कंफर्म केले आहे. तसेच, आता नवीन टिझरमध्ये डिझाईनची माहिती शेअर करण्यात आली आहे. फोन दिसण्यामध्ये पूर्व मॉडेल प्रमाणे आहे मात्र यात काही बदल पण आहेत. चला, पुढे लूकबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Realme 13 Pro 5G सीरीज डिझाईन माहिती

  • Realme 13 Pro 5G ला नवीन मोनेट गोल्ड कलरमध्ये दाखविण्यात आले आहे, परंतु ब्रँड याचे मोनेट पर्पल रंग पण सादर करेल.
  • डिव्हाईस ग्लास-बॅक एडिशन मध्ये उपलब्ध होईल. तर मागील बाजूस वेगन लेदर व्हेरिएंट एमराल्ड ग्रीन कलरमध्ये येईल.
  • रियलमीने बोस्टनच्या म्यूजियम ऑफ फाईन आर्ट्स (MFA) सह भागेदारी केली आहे आणि हा फोन मोनेट मास्टरपीसने प्रेरित आहेत.
  • ब्रँडद्वारे सांगितले आहे की फोटोमध्ये फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅशसह दिसतो. यात हायपरइमेज ब्रँडिंग पण आहे.
  • रियलमी 13 प्रो 5G मध्ये सेल्फीसाठी केंद्र मध्ये पंच-होल कटआऊट आणि किनाऱ्यावर कर्व एज आहे.
  • मोबाईलच्या उजव्या साईडवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत.
  • तसेच Realme 13 Pro च्या बॅक पॅनलवर हाय-ग्लॉस AG ग्लास आहे.
  • कंपनीने 360-डिग्री लग्जरी वॉच-लेव्हल टेक्सचर सुनिश्चित करण्यासाठी स्मार्टफोनला सनराइज हेलो डिझाईनने पण सुसज्ज केले आहे.

Realme 13 Pro 5G सीरीजचे स्पेसिफिकेशन

Realme 13 Pro सीरीजमध्ये ड्युअल Sony कॅमेरा दिला जाणार असल्याची पुष्टी झाली आहे. ज्यात जगातील पहिला Sony LYT-701 प्रायमरी कॅमेरा आणि Sony LYT-600 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असेल. त्याचबरोबर डिव्हाईस TUV रिनलँड हाय-रिजॉल्यूशन कॅमेरा सर्टिफिकेशन सह लाँच होईल.

Realme 13 Pro+ चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: Realme 13 Pro+ TENAA लिस्टिंगनुसार यात 6.7 इंचाची कर्व्ड-एज अ‍ॅमोलेड स्क्रीन मिळू शकते यावर 2412 x 1080 चा FHD+ पिक्सल आणि इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाऊ शकतो.
  • चिपसेट: फोनमध्ये 2.4GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर असू शकतो. हा स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 या 7 एस जेन 3 असू शकतो.
  • स्टोरेज: डिव्हाईसला 6 जीबी, 8 जीबी, 12 जीबी आणि 16 जीबी रॅमसह 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह एंट्री मिळू शकते.
  • कॅमेरा: फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि बॅक पॅनलमध्ये 50 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 50 मेगापिक्सलची ट्रिपल कॅमेरा लेन्स लावली जाऊ शकते.
  • बॅटरी: Realme 13 Pro+ 5G मध्ये 5,050mAh (रेटेड वैल्यू) ची बॅटरी आणि 80 वॉट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here