8GB पर्यंत रॅम, 5000mAh बॅटरीसह लाँच झाला स्वस्त स्मार्टफोन itel P65C, जाणून घ्या ग्लोबल किंमत

आयटेलने आपल्या P65 सीरीज प्रोडक्ट पोर्टफोलियोला पुढे वाढविले आहे. यानुसार नवीन मोबाईल itel P65C ग्लोबल बाजार जाम्बिया मध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डिव्हाईसमध्ये कमी किंमतीमध्ये 5000mAh बॅटरी, व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीच्या मदतीने 8GB पर्यंत रॅम, 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. चला, पुढे तुम्हाला संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती सविस्तर सांगतो.

itel P65C ची डिझाईन

डिझाईन पाहता itel P65C स्मार्टफोनमध्ये शानदार लूक आहे. डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि एक एलइडी फ्लॅश दिसतो फोनच्या उजव्या बाजूला पावर आणि वॉल्यूम बटन देण्यात आले आहेत. तर फ्रंट पॅनल फ्लॅट दिसतो यात युजर्सना पंच होल डिझाईन देण्यात आली आहे. जाम्बिया मध्ये ग्राहक या डिव्हाईसला तीन रंगामध्ये खरेदी करू शकता. ज्यात मूनलिट ब्लॅक, ऑरोरा ब्लू आणि ब्रिलियंट गोल्डचा समावेश आहे.

itel P65C चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: डिस्प्ले पाहता यात 6.6 इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो चांगला आणि स्मूद युजर एक्सपीरियंससाठी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • चिपसेट: itel P65C स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना परफॉर्मन्ससाठी एंट्री लेव्हल Unisoc T606 चिपसेट देण्यात आली आहे. हा 12 नॅनोमीटर वर आधारित ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. जो स्मूद अनुभव देतो.
  • स्टोरेज आणि रॅम: नवीन डिव्हाईसमध्ये उपयोगकर्ताला एकूण 8GB रॅम मिळते, म्हणजे यात 4GB इनबिल्ट रॅम + 4GB व्हर्च्युअल रॅमचा कॉम्बो आहे. त्याचबरोबर 128GB इंटरनल स्पेस प्रदान करण्यात आले आहे.
  • कॅमेरा: कंपनीने चांगल्या कॅमेरा एक्सपीरियंससाठी रिअर सेटअपमध्ये LED फ्लॅशसह 13MP चा प्रायमरी कॅमेरा लावला आहे. त्याचबरोबर एक अन्य लेन्स लावली आहे. तसेच, सेल्फी कॅमेरा पण आहे.
  • बॅटरी आणि चार्जिंग: मोठ्या बॅकअपसाठी ब्रँडद्वारे डिव्हाईसमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीनं बॅटरीला डे-टू-नाईट पावर मैराथन टॅगलाईन सह दाखविले आहे. डिव्हाईस सह 18W चा फास्ट चार्जर दिला जात आहे. यामुळे 10 मिनिटाच्या चार्जवर 3 तासापर्यंत चॅट केली जाऊ शकते.

itel P65C ची किंमत आणि उपलब्धता

itel P65C सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. ज्यात 4 जीबी+4 जीबी व्हर्च्युअल रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. याची किंमत जाम्बिया मध्ये K2,200 म्हणजे जवळपास 7,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा या देशाच्या सर्व मुख्य रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here