Home बातम्या Jio चा सर्वात स्वस्त प्लान: फक्त साडेतीन रुपयांमध्ये मिळेल 1GB डेटा, जाणून घ्या या रिचार्ज बाबत सर्वकाही

Jio चा सर्वात स्वस्त प्लान: फक्त साडेतीन रुपयांमध्ये मिळेल 1GB डेटा, जाणून घ्या या रिचार्ज बाबत सर्वकाही

जगात भारत असा एकमेव देश आहे जिथे मोबाईल डेटा सर्वात कमी किंमतीत उपलब्ध केला जात आहे. मोबाईल यूजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आज भारतातील टेलीकॉम कंपन्या कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त डेटा देणारे प्लान सादर करत आहेत. स्वस्त डेटाचा उल्लेख होत असेल आणि जियोचे नाव आले नाही तर कसे चालेले. रिलायंस जियोकडे वेगवेगळ्या किंमतीतले अनेक प्लान्स आहेत, ज्यात वैधतेनुसार डेटा आणि कॉलिंग मिळते. पण आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या सर्वात स्वस्त डेटा असलेल्या प्लानची माहिती देणार आहोत. या प्लान मध्ये फक्त 3.5 रुपये खर्च केल्यावर 1जीबी डेटा यूजर्सना दिला जात आहे.

या प्लान मध्ये मिळेल 3.5 रुपयांमध्ये 1जीबी डेटा

जियोच्या 599 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना फक्त 3.5 रुपये खर्च केल्यावर 1जीबी डेटा मिळेल. या प्लान मध्ये ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह रोज 2जीबी मिळतो. म्हणजे ग्राहकांना 599 रुपयांमध्ये एकूण 168जीबी डेटा मिळतो. याचाच अर्थ असा कि ग्राहकांना 1जीबी डेटा वापरण्यासाठी जवळपास 3.57 रुपये खर्च करावे लागतात. यूजर्सना 1जीबी डेटासाठी खूप कमी किंमत द्यावी लागते.

प्लान मध्ये फक्त डेटा नाहीत तर इतर अनेक सुविधा दिल्या जात आहेत. या प्लान मध्ये यूजर्सना जियो ते जियो नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंगसाठी 3000 मिनिट्स मिळतात. इतकेच नव्हे तर प्लान मध्ये रोज 100 एसएमएस आणि जियो ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

हे देखील वाचा: Jio चा स्वस्त 5G फोन डिसेंबर मध्ये होईल लॉन्च, मुकेश अंबानींनी केली तयारी

किंमतच्या बाबतीत स्वस्त असलेला जियोचा प्लान म्हणजे 28 दिवसांची वैधाता असेलला 129 रुपयांचा प्लान. यात एकूण 2जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यावर पण यूजर्स 64Kbps स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. जियो नेटवर्क वर अनलिमिटेड आणि नॉन-जियो नेटवर्क वर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स मिळतात. या पॅक मध्ये एकूण 300 मोफत एसएमएस मिळतात. तसेच जियो ऍप्सचे सब्सक्रिप्शन पण ग्राहकांना मोफत मिळत आहे.