Categories: बातम्या

जियो युजर्सना मोठा धक्का; न सांगता बंद केले अनेक लोकप्रिय प्लॅन्स, तुमचा प्लॅन तर नाही ना या यादीत?

Reliance Jio Plan: Akash Mukesh Ambani (आकाश मुकेश अंबानी) ची कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) नं अलीकडेच Jio 5G Welcome Offer (Jio True 5G) सादर केली आहे, त्यामुळे ग्राहक खूप खुश होते. परंतु युजर्सचा हा आनंद अल्पायुषी ठरला कारण कंपनीनं एकाच वेळी 12 रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) गुपचूप बंद केलेत आहेत. कंपनीनं आपल्या वेबसाइट आणि जियो अ‍ॅपवरून Disney+ HotStar च्या मोबाइल सब्सक्रिप्शनसह येणारे 12 प्लॅन डिस्कन्टीन्यू केले आहेत. बंद झालेल्या प्लॅनची माहिती तुम्हाला पुढे देण्यात आली आहे.

जियोन युजर्सना दिला धक्का

12 प्लॅन बंद केल्यानंतर देखील कंपनी कडे 2 प्लॅन असे आहेत, जे या लोकप्रिय OTT (Disney+ HotStar) च्या फ्री सब्सक्रिप्शनसह येतात. तसेच कंपनीनं काही प्लॅन बंद केले आहेत तर काहींचं सब्सक्रिप्शन बेनिफिट काढून टाकण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया या रिचार्ज प्लॅनबाबत सर्वकाही. हे देखील वाचा: सावधान! 5G अपग्रेडच्या नावाखाली होतेय फसवणूक, अशाप्रकारे करा स्वतःचा बचाव

Jio नं बंद केले आहेत हे प्लॅन

  • 151 रुपये Disney+ Hotstar (डाटा अ‍ॅड-ऑन प्लॅन)
  • 555 रुपयांचा Disney+ Hotstar (डाटा अ‍ॅड-ऑन प्लॅन)
  • 659 रुपयांचा Disney+ Hotstar (डाटा अ‍ॅड-ऑन प्लॅन)
  • 333 रुपयांचा Disney+ Hotstar प्लॅन
  • 499 रुपयांचा Disney+ Hotstar प्लॅन
  • 583 रुपयांचा Disney+ Hotstar प्लॅन
  • 601 रुपये Disney+ Hotstar प्लॅन
  • 783 रुपयांचा Disney+ Hotstar प्लॅन
  • 799 रुपयांचा Disney+ Hotstar प्लॅन
  • 1066 रुपयांचा Disney+ Hotstar प्लॅन
  • 2999 रुपयांचा Disney+ Hotstar प्लॅन
  • 3119 रुपयांचा Disney+ Hotstar प्लॅन

Note: उपरोक्त प्लॅन जियोच्या अधिकृत वेबसाइट आणि कंपनीच्या अ‍ॅपवरून हटवण्यात आले आहेत. 2,999 रुपयांच्या पॅक अजूनही लिस्टेड आहे, परंतु आता यात Disney+ HotStar चं सब्सक्रिप्शन दिलं जात नाही. कंपनीनं याबाबत कोणतीही माहिती मात्र दिली नाही.

आता या प्लॅनमध्ये मिळतंय Disney+ HotStar चं सब्सक्रिप्शन

महत्वाची बाब म्हणजे अजूनही Jio च्या 2 प्लॅनमध्ये Disney+ HotStar चं सब्सक्रिप्शन मिळत आहे. कंपनीनं 1,499 रुपये आणि 4,199 रुपयांचे दोन प्लॅन Plan With OTT Benefits कॅटेगरीमध्ये लिस्ट केले आहेत. हे देखील वाचा: Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या

1499 रुपयांचा प्लॅन पाहता डेली 2GB डेटा, फ्री कॉलिंग, डेली 100 एसएमएस सह 84 दिवसांची वैधता मिळते. तर 4199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह डेली 3GB डेटा, फ्री कॉलिंग आणि एसएमएस दिले जात आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये Disney+ HotStar चं सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

Published by
Siddhesh Jadhav