अंबानीचे सरप्राईज, Prime Video सब्सक्रिप्शनसह लाँच केला डेली 2GB डेटा असलेला प्लॅन

Image Credit: business standard

रिलायन्स जियोने आपल्या प्रीप्रेड रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये एक नवीन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनला कंपनीने ओटीटी सब्सक्रिप्शनसह आणले आहे, ज्याची किंमत 857 रुपये आहे. ओटीटी सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये दीर्घ वैधता व्यतिरिक्त आणि पण अनेक बेनिफिट्स मिळत आहेत. जर तुम्ही जिओचे ग्राहक आहात आणि एक नवीन प्लॅनच्या शोधामध्ये आहात तर या रिचार्जचा वापर केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया जिओच्या या नवीन प्लॅनबाबत सर्व माहिती….

रिलायन्स जिओचा Rs 857 च्या प्लॅनचे फायदे

जर Reliance Jio Rs 857 Recharge Plan बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने शांतपणे आपल्या साईटवर लिस्ट केला आहे. या प्लॅनची खासियत आहे की यात ओटीटीसह फ्री कॉलिंग, एसएमएस, डेटा आणि जिओ अ‍ॅप्सचा लाभ मिळत आहेत.

  • या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांपर्यंतची आहे. फायद्याबद्दल बोलायचे झाले तर, जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2GB डेटाची सुविधा मिळेल.
  • 84 दिवसाची व्हॅलिडिटी नुसार प्लॅनमध्ये तुम्हाला 168GB डेटाचा अ‍ॅक्सेस मिळेल. डेली डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64 Kbps होईल.
  • याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कलिंग पण मिळते. युजर्स 84 दिवस पर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात.
  • प्लॅनमध्ये डेली 100 फ्री SMS ची सुविधा पण देण्यात आली आहे. फक्त डेटा, कॉलिंग आणि SMS चा फायदा नाही तर जिओचा हा नवीन प्लॅन ग्राहकांना मनोरंजनाचे पण पूर्ण ध्यान ठेवतो.

ओटीटीचा पण मिळेल लाभ

प्लॅनमध्ये Amzon Prime Video Mobile Edition चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. तसेच सब्सक्रिप्शन पण पूर्ण 84 दिवस पर्यंतसाठी युजर्ससाठी उपलब्ध होईल. त्याचबरोबर प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud सुविधा पण सामिल करण्यात आली आहे. म्हणजे प्लॅनमध्ये एंटरटेनमेंटचा फायदा पण कमी नाही होणार, तसेच जिओ ग्राहकांना या प्लॅनसह 5G Welcome Offer पण मिळेल.

जिओ प्राईम व्हिडिओ प्लॅन

  • Jio 1,198 रुपयांचा प्लॅन: यात 84 दिवस म्हणजे पूर्ण एक वर्षाची व्हॅलिडिटी मिळते. तसेच, युजर्सना प्लॅनमध्ये 2GB डेली डेटा, रोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा पण ऑफर केली जात आहे. तसेच, प्लॅनमध्ये Prime Video Mobile सब्सक्रिप्शनसह Disney+Hotstar, Sony LIV, ZEE5, Discovery+, JioCinema Premium, Lionsgate Play, Hoichoi, DocuBay, EPIC ON, Sun NXT, Chaupal समवेत एकूण 14 ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळते.
  • Jio 3,227 रुपयांचा प्लॅन: यात 365 दिवस म्हणजे पूर्ण एक वर्षाची व्हॅलिडिटी मिळते. तसेच, युजर्सना प्लॅनमध्ये 2GB डेली डेटा आणि एक्सट्रा 78 जीबी डेटा फ्री, रोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा पण ऑफर केली जात आहे. इतकेच नव्हे तर ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राईम मोबाईल एडिशन, Jio TV, JioCinema, आणि JioCloud चा अ‍ॅक्सेस दिला जात आहे.
  • Jio 4,498 रुपयांचा प्लॅन: यात 365 दिवस म्हणजे पूर्ण एकाची वर्षाची व्हॅलिडिटी मिळते. तसेच, युजर्सना प्लॅनमध्ये 2GB डेली डेटा आणि एक्सट्रा 18जीबी डेटा फ्री, रोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा पण ऑफर केली जात आहे. इतकेच नव्हे तर ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राईम मोबाईल एडिशन व्यतिरिक्त Disney+Hotstar, Sony LIV, ZEE5, Discovery+, JioCinema Premium, Lionsgate Play, Hoichoi, DocuBay, EPIC ON, Sun NXT, Chaupal समवेत एकूण 14 ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here