Lava Blaze X जुलै महिन्यामध्ये भारतात लाँच झाला आहे ज्याची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. 3D Curved Edge डिस्प्ले, 64MP Camera आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर असणाऱ्या या फोननंतर आता कंपनी आपल्या ‘युवा’ सीरीजमध्ये लो बजेट मोबाईल Lava Yuva Star 4G घेऊन येत आहे ज्याचा लाईव्ह फोटो आणि स्पेसिफिकेशन लाँचच्या आधी इंटरनेटवर लीक झाली आहे.
Lava Yuva Star 4G चे स्पेसिफिकेशन (लीक)
- लावा युवा स्टार 4 जी फोनचा लाईव्ह फोटो टिपस्टर पारस गुगलानीने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.
- फोटोमध्ये दिसत आहे कि हा मोबाईल ‘यू’ शेप वाली वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच केला जाईल.
- लीकनुसार Lava Yuva Star 4G फोनमध्ये 6.75-इंचाची एचडी+ स्क्रीन दिली जाईल.
- हा लावा मोबाईल 4GB RAM वर लाँच केला जाईल ज्याच्यासोबत 64GB आणि 128GB Storage मिळेल.
- मिळालेल्या माहितीनुसार लावा युवा स्टारमध्ये 4 जीबी वचुर्अल रॅम पण उपलब्ध राहिल जी फिजिकल रॅमसह मिळून याला 8GB RAM (4+4) ची ताकद देईल.
- Lava Yuva Star 4G स्मार्टफोनला पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरीसह बाजारात आणले जाईल.
- परफॉर्मन्स पावर पाहता या स्वस्त लावा स्मार्टफोनमध्ये Unisoc T750 ऑक्टा-कोर प्रोसेसर पाहायला मिळू शकतो.
- फोटोग्राफीसाठी Lava Yuva Star मध्ये 13MP ड्युअल रिअर कॅमेरा तसेच 8MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Lava Yuva Star 4G किंमत (लीक)
समोर आलेल्या लीकनुसार लावा युवा स्टार 4 जी फोन 64 जीबी स्टोरेज तसेच 128 जीबी स्टोरेजवर लाँच केला जाऊ शकतो. या मोबाईलची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते तसेच मोठ्या व्हेरिएंटची किंमत 8,000 रुपयांच्या रेंज ठेवली जाऊ शकते. लीकनुसार लावा युवा स्टार 4 जी फोन Purple, white आणि black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
Lava Yuva 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन
- किंमत : युवा सीरीजच्या लेटेस्ट आणि स्वस्त 5 जी फोन पाहता Lava Yuva 5G 4GB+64GB व्हेरिएंट 9,499 रुपयांमध्ये तसेच 4GB+128GB व्हेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
- डिस्प्ले : Lava Yuva 5G फोन 720 × 1600 पिक्सल रेजोल्यूशन असणारी 6.52-इंचाच्या HD+ स्क्रीनला सपोर्ट करतो. हा 2.5D कर्व्ड ग्लास असणारा एलसीडी डिस्प्ले आहे जो 90Hz रिफ्रेश रेटवर चालतो.
- प्रोसेसर : हा फोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो UniSoC T750 चिपसेटवर चालतो. फोनमध्ये 4 जीबी रॅमची ताकद देण्यात आली आहे ज्याच्यासोबत 4 जीबी वचुर्अल रॅम पण मिळते.
- कॅमेरा : Lava Yuva 5G फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर आहे. तसेच, फ्रंट पॅनलवर स्क्रीन फ्लॅशसह 8MP सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा मोबाईल फोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच याला फास्ट चार्ज करण्यासाठी 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.














