4000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 765G सह येईल LG Q92 5G, इथे बघा फुल स्पेसिफिकेशन्स

कोरियन टेक दिग्गज कंपनी एलजी च्या आगामी 5G LG Q92 स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. आशा आहे कि हा डिवाइस एलजी वेलवेट 5जी पेक्षा जास्त किफायतशीर असेल. काही दिवसांपूर्वी फोन गीकबेंच आणि गूगल प्ले कंसोल वर लिस्ट झाला होता. या सर्टिफिकेशन साइट वर फोनची काही माहिती समोर आली होती. तसेच आता याच्या रिलीजच्या आधी सर्व स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

कोरियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नेवर कॅफे वर डिवाइसच्या एका स्पेसिफिकेशन शीटचे फोटो शेअर करण्यात आले आहेत, जे फोनच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच डिजाइनची माहिती पण देतात. तसेच एका कोरियन वेबसाइट वर माहिती मिळाली आहे कि कंपनी हा फोन 28 ऑगस्टला लॉन्च करेल.

किंमत आणि विक्री

LG Q92 5G च्या प्री-ऑर्डरची प्रक्रिया 21 ऑगस्ट पासून होईल आणि फोनची विक्री 28 ऑगस्ट पासून सुरु होईल. तसेच फोन को साउथ कोरिया मध्ये 545,000 Won (जवळपास 34,000 रुपये) मध्ये सादर केला जाईल. फोनच्या अधिकृत किंमतीत आणि लॉन्च डेट मध्ये फरक असू शकतो.

डिजाइन

फोनची डिजाइनपाहता एलजी डिवाइस मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध एक पंच-होल देईल. फोन फ्लॅट एलसीडी डिस्प्ले सह येईल. तसेच मागे मोठया सर्कल मध्ये दोन कॅमेरे आणि त्याच्या बाजूला छोट्या सर्कल मध्ये दोन कॅमेरे असतील. छोट्या सर्कल मधील कॅमेऱ्यांच्या वर एलईडी फ्लॅश दिला जाईल. हे कॅमेरे फोनच्या मागे उजवीकडे असतील. एलजीचा हा डिवाइस तीन कलर ऑप्शन- सिरेमिक व्हाइट, मिरर टाइटेनियम आणि मिरर रेड मध्ये उपलब्ध केला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

LG Q92 5G मध्ये मोठा 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले असेल. तसेच डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेट वर चालेल जो शक्तिशाली मिड-रेंज चिपसेट आहे. Q92 5G मधील SoC बाबत खास बाब अशी आहे कि हा स्टॉक SD765G चिपसेटच्या तुलनेत थोडा ओवरक्लॉक केला जाईल आणि ग्राफिक्स मध्ये 10 टक्के सुधारणा मिळेल. लॉन्चच्या वेळी फोन एंडरॉयड 10 सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे चार कॅमेरे असतील. या सेटअप मध्ये 48MP प्राइमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड-अँगल कॅमेरा, 5MP डेप्थ सेंसर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल. तसेच एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. फोन एलजी पे सपोर्ट सह येईल, म्हणजे फोन एनएफसी सपोर्ट सह येईल. हँडसेट मध्ये पावरसाठी 4000mAh ची बॅटरी फास्ट चार्जिंग सह देण्यात येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here