Home बातम्या ती पुन्हा आली! LML कंपनीनं सादर केली शानदार इलेक्ट्रिक स्कूटर Star

ती पुन्हा आली! LML कंपनीनं सादर केली शानदार इलेक्ट्रिक स्कूटर Star

Highlights
  • LML Star इलेक्ट्रिक स्कूटर आज भारतात ऑफिशयल झाली आहे.
  • Auto Expo 2023 च्या मंचावरून ही टू-व्हीलर सादर करण्यात आली आहे.
  • ही देशातील पहिली customizable interactive display असलेली ई-स्कूटर आहे.

80 आणि 90 च्या दशकात भारतातील ऑटोमोबाइल मार्केटवर राज्य करणारी एलएमएल टू-व्हीलर्स पुनरागमन करत आहे. किफायती आणि स्टायलिश एलएमएल स्कूटर भारतात खूप लोकप्रिय होत्या आणि आता पुन्हा तीच जादू निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. Auto Expo 2023 च्या मंचावरून नवीन इलेक्ट्रिक स्कूटर LML Star लाँच झाली आहे. या LML Electric Scooter मध्ये शानदार लुक आणि आर्कषक फीचर्स देण्यात आले आहेत.

LML Star एक प्रीमियम प्रोडक्ट आहे जो यूनिक डिजाईनसह बाजारात आला आहे. भारतीय बाजारात असा लुक असलेली स्कूटर किंवा स्कूटी सध्या उपलब्ध नाही. एलएमएल स्टार ई-स्कूटर मध्ये customizable interactive display सारख्या अ‍ॅडव्हान्स फीचरचा वापर करण्यात आला नाही ज्याच्या मदतीनं तुमची तुमच्या आवडीचा टेक्स्ट स्क्रीनवर आणू शकता. या फीचरसह रोज नवीन स्लोगन किंवा स्टेटस स्कूटरवर ठेवता येईल. हे देखील वाचा: Amazon Great Republic Day आज रात्री होणार सुरु; मिळणार अनेक दमदार डील्स आणि डिस्काउंट

LML Star चे फीचर्स

एलएमएल स्टारची निर्मिती भारत आणि इटलीच्या प्रोफोशनल्सनी मिळून केली आहे तसेच ही पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर रिमूव्हेबल बॅटरीसह येते ज्यात बॅटरी पॅक व्हेईकलच्या बाहेत काढून चार्ज करता येतो. कंपनी हिला फुल्ली इलेक्ट्रिक टू-व्हीलर म्हणत आहे. ज्यात सेफ्टीसाठी ABS म्हणजे अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, रिवर्स पार्क असिस्ट आणि TPMS म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

LML Star मधील मोटरच्या पावरची माहिती मात्र कंपनीनं सांगितली नाही. परंतु एलएमएलनं दावा केला आहे की मोटर आणि बॅटरीच्या मदतीनं स्मूद आणि आरामदायक राइड मिळेल. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ambient light, integrated DRLs, backlights आणि इंटिग्रेटेड indicators सारखे फीचर्स आहेत जे शानदार लुक देतात.

LML Star प्राइस व सेल

एलएमएल इलेक्ट्रिक स्कूटरची कोणतीही सेल डेट कंपनीनं अद्याप सांगितली नाही. परंतु माहितीनुसार सप्टेंबर 2023 पर्यंत एलएमएल स्टारची डिलिव्हरी देशात सुरु केली जाईल. किंमत पाहता LML Star Scooter Price वर देखील कंपनीनं पडदा कायम ठेवला आहे. या ई-स्कूटरची किंमत 1.25 लाख रुपयांपर्यंत असू शकते, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: तासंतास गेमिंग नंतर देखील थंड राहील हा फोन; 12 लेयर कूलिंग सिस्टमसह होणार Poco X5 Pro ची एंट्री

एलएमएलचा इतिहास

1972 मध्ये LML (लोहिया मशीनरी लिमिटेड) ची स्थापना झाली होती. ही दुचाकी वाहने निर्माण करणारी भारतातील एक प्रमुख कंपनी आहे, जी स्कूटर, मोटरसायकल, मोपेडसह पार्टस आणि अ‍ॅक्सेसरीजची निर्मिती आणि विक्री करते. कंपनी अमेरिका, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, न्यूजीलँडसह जगभरातील विविध देशांमध्ये आपले प्रोडक्ट निर्यात करते. 80-90 च्या दशकात भारतीय बाजारात कंपनीचा खूप मोठा जलवा होता.