Amazon Great Republic Day आज रात्री होणार सुरु; मिळणार अनेक दमदार डील्स आणि डिस्काउंट

Highlights

  • Amazon वर Great Republic Day सेल आज रात्री मध्यरात्रीपासून सुरु होईल.
  • या सेल दरम्यान स्मार्टफोन, लॅपटॉप आणि अन्य डिवाइसेसवर जबरदस्त डिस्काउंट मिळेल.
  • अ‍ॅमेझॉननं ग्रेट रिपब्लिक डे सेलसाठी SBI सह पार्टनरशिप केली आहे.

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर Great Republic Day सेल डेटची घोषणा करण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनवर प्राइम मेंबर्स आज रात्री म्हणजे 14 जानेवारीपासून या सेलमधील शानदार ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील. त्याचबरोबर Amazon वर सामान्य ग्राहक 15 जानेवारीपासून या सेलचा लाभ घेऊ शकतील. अ‍ॅमेझॉनवर हा सेल 20 जानेवारी पर्यंत सुरु राहील. Amazon Great Republic Day सेलसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनं भारतीय स्टेट बँक (SBI) सह पार्टनरशिप केली तसेच ग्राहकांना अतिरिक्त सूट देखील मिळेल.

SBI कार्डवर 10% डिस्काउंट

अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या रिपब्लिक डे सेल दरम्यान Apple, OnePlus, Redmi, Poco, Samsung आणि इतर अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनवर फ्लॅट डिस्काउंट देत आहेत. त्याचबरोबर ग्राहकांना SBI क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. ही ऑफर SBI कार्डवरील EMI ट्रँजॅक्शनवर उपलब्ध आहे.

स्वस्तात स्मार्टफोनची खरेदी

Amazon ने अद्याप सेलमधील मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली नाही. परंतु एवढं समजलं आहे की अ‍ॅमेझॉन रिपब्लिक डे सेल दरम्यान iPhone 13 आणि iPhone 14 वर आकर्षक डील्स मिळतील. तसेच या सेलमध्ये OnePlus, Redmi, Samsung, Xiaomi, आणि अन्य ब्रँडच्या स्मार्टफोनवर दमदार डिस्काउंट दिला जाईल. अजूनही सेलमधील मोठ्या डील्सची माहिती गुलदस्त्यात आहे.

अ‍ॅमेझॉननुसार, सेल दरम्यान स्मार्टफोन 40 टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करता येतील. OnePlus 10T, Samsung Galaxy S20 FE, iQOO Neo 6, Redmi Note 11, आणि इतर स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट अपेक्षित आहे.

लॅपटॉप आणि हेडफोनवर सूट

स्मार्टफोनसह अ‍ॅमेझॉन रिपब्लिक डे सेल दरम्यान लॅपटॉप, हेडफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर देखील डिस्काउंट दिला जाईल. अ‍ॅमेझॉननं सेल टीज करत सांगितलं आहे की लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर स्मार्टवॉच किंवा इतर फिटनेस बँडवर 75 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे.

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान हेडफोन आणि नेकबँडवर 75 टक्के आणि स्पिकरवर 65 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये होम अ‍ॅप्लांसेज जसे की – टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एयर कंडीशनर आणि डिशवॉशरवर देखील दमदार डिस्काउंट मिळेल.

अ‍ॅमेझॉनवर 14 जानेवारीपासून लाइव्ह होणाऱ्या सेल दरम्यान फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह नो-कॉस्ट ईएमआय आणि काही स्मार्टफोनसह फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here