Home बातम्या फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला 2 जीबी रॅम असलेला हा स्वस्त स्मार्टफोन

फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला 2 जीबी रॅम असलेला हा स्वस्त स्मार्टफोन

Gionee ने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Gionee Max लॉन्च केला होता. हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि फक्त 5,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. जियोनी मॅक्सच्या माध्यमातून कंपनीने अनेक दिवसानंतर भारतीय बाजारात पुनर्प्रवेश केला होता. पण आता वाटते आहे कि जियोनीने मोठी खेळी खेळण्यासाठी भारतात परतली आहे. देशात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत जियोनीने आज पुन्हा आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन Gionee F8 Neo नावाने भारतात लॉन्च केला आहे.

Gionee F8 Neo ने भारतीय बाजारात सध्या एकाच वेरिएंट मध्ये एंट्री घेतली आहे. हा स्मार्टफोन 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो सोबतच 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीने या फोनची किंमत 5,499 रुपये ठेवली आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. जियोनी एफ8 नियो Black, Blue आणि Red कलर मध्ये विकत घेता येईल.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

जियोनी एफ8 नियो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने नॉचलेस डिस्प्ले वर सादर केला आहे. एंट्री लेवल स्मार्टफोन असल्यामुळे फ्रंट पॅनल वर बेजल्स असलेला डिस्प्ले देण्यात आली आहे. स्क्रीनच्या वर आणि खाली रुंद पार्ट आहे तसेच साईडला नॅरो बेजल्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.4 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Gionee F8 Neo अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह UNISOC SC9863A चिपसेट वर चालतो. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करणाऱ्या या फोन मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत एक्सपांड केली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : फक्त 5999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी असलेला हा नवीन फोन, रिवर्स चार्जिंगला पण करतो सपोर्ट

जियोनी एफ8 नियो एलईडी फ्लॅश सह 8 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Gionee F8 Neo बेसिक कनेक्टिविटी सह येतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Gionee Max

Gionee Max कंपनीने 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च झाला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह Spreadtrum 9863A चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी जियोनी मॅक्स मध्ये आईएमजी8322 जीपीयू देण्यात आला आहे.

जियोनी मॅक्स एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Gionee Max डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि सेकेंडरी डिजीटल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी, 48MP क्वॉड कॅमेरा आणि 4GB रॅम सह Huawei Y7a लॉन्च, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Gionee Max एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी जियोनी मॅक्स मध्ये रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन ब्लॅक, रेड आणि रॉयल ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे जो फक्त 5,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.