फक्त 5999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी असलेला हा नवीन फोन, रिवर्स चार्जिंगला पण करतो सपोर्ट

टेक ब्रांड Gionee ने आज बऱ्याच दिवसांनंतर भारतीय बाजारात वापसी केली आहे. दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये आर्थिक अडचणीमुळे जियोनीला आपले प्रोडक्शन बंद करावे लागेल होते. पण पुन्हा एकदा मोबाईल बाजारात चांगल्या भविष्याच्या अपेक्षांसह हि कंपनी परत आली आहे. यावेळी जियोनीने आपली सुरवात लो बजेट स्मार्टफोन Gionee Max पासून केली आहे जो इंडियन मार्केट मध्ये फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

लुक व डिजाईन

Gionee Max कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर लॉन्च केला आहे. फोन स्क्रीनच्या तीन कडा नॅरो बेजल्स असलेल्या आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. सेटअपच्या खाली नीचे फ्लॅश आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नाही . पावर बटन व वाल्यूम रॉकर जियोनी मॅक्सच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत तर वरच्या बाजूच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आणि खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Gionee Max कंपनीने 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च झाला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह Spreadtrum 9863A चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी जियोनी मॅक्स मध्ये आईएमजी8322 जीपीयू देण्यात आला आहे.

जियोनी मॅक्स एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Gionee Max डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि सेकेंडरी डिजीटल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Gionee Max एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी जियोनी मॅक्स मध्ये रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन ब्लॅक, रेड आणि रॉयल ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे जो फक्त 5,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here