विवोनं सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Vivo Y16 लाँच केला होता. विवो वाय16 फक्त 12,499 रुपयांमध्ये लाँच झाला होता ज्यात 4GB RAM, Meditek Helio P35 चिपसेट, 13MP Camera आणि 5,000mAh Battery मिळते. आता आता हा विवो मोबाइल नवीन व्हेरिएंट्ससह फक्त 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत विकल्या जाणाऱ्या Vivo Y16 मध्ये कोणते फीचर्स आहेत, तसेच याच्या नव्या व्हेरिएंट्सची किंमत किती आहे, याची माहिती आम्ही पुढे दिली आहे.
Vivo Y16 Price
विवो वाय16 स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच दुसरा व्हेरिएंट 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. विवो वाय16 मोबाइलचा सर्वात मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या तिन्ही व्हेरिएंटची प्राइस अनुक्रमे 9,999 रुपये, 10,499 रुपये आणि 12,499 रुपये आहे. विवो वाय16 Drizzling Gold आणि Stellar Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: एक दोन नव्हे तर 12 5G बँड्स असलेल्या फोनवर जबरदस्त सूट; कमी किंमतीत पावरफुल प्रोसेसरची ताकद
Vivo Y16 3GB RAM + 32GB Storage = 9,999 रुपये
Vivo Y16 3GB RAM + 64GB Storage = 10,499 रुपये
Vivo Y16 4GB RAM + 64GB Storage = 12,499 रुपये
Vivo Y16 Specifications
विवो वाय16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 2.5डी कर्व ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनची जाडी 8.19 एमएम आणि वजन 183 ग्राम आहे.
Vivo Y16 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा विवो मोबाइल 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 1 जीबी अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल. तसेच मेमरी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी हा विवो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 9 हजारांच्या बजेटमध्ये Vivo Y01A ची एंट्री; कमी किंमतीत करेल का realme-redmi ची सुट्टी?
Vivo Y16 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
