12 5G बँड्स असलेल्या Moto G62 5G फोनवर 27 टक्क्यांची सूट

Motorola India नं ऑगस्ट 2022 मध्ये आपला स्वस्त 5G मोबाइल Moto G62 भारतीय बाजारात सादर केला होता. या हँडसेटमध्ये 120hz रिफ्रेश रेट, 8GB RAM, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी असे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स कमी किंमतीत देण्यात आले आहेत. परंतु इतक्या कमी किंमतीत देखील 12 5G बँड्सचा सपोर्ट असलेल्या काही निवडक स्मार्टफोन पैकी एक असल्यामुळे हा खूप लोकप्रिय ठरला. आता या मोटो जी62 स्मार्टफोनवर मर्यादित कालावधीसाठी मोठी सूट दिली जात आहे. पुढे आम्ही या ऑफरची माहिती दिली आहे.

Moto G62 5G वरील ऑफर आणि किंमत

Moto G62 5G स्मार्टफोनवर कंपनीकडून 27 टक्क्यांची सूट दिली जात आहे. त्यामुळे 17,999 रुपयांमध्ये लाँच झालेला या स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट काही काळ डिस्काउंटनंतर 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्ड धारकांना 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तुम्ही हा फोन 555 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेऊ शकता. हे देखील वाचा: What Is Community In WhatsApp And How To Use: व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या

Moto G62 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपये आहे. परंतु ऑफर अंतर्गत हे दोन्ही व्हेरिएंट अनुक्रमे 15,999 रुपये आणि 17,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहेत. हा फोन फ्रॉस्टेड ब्लू आणि मिडनाइट ग्रे कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

Moto G62 5G चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तसेच डिवाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G SoC वर चालतो जो भारतात 5G कनेक्टिव्हिटीच्या 12 बँडसह सादर करण्यात आला आहे. हा दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट 6GB + 128GB आणि 8GB + 128GB सह बाजारात आला आहे. हे देखील वाचा: 9 हजारांच्या बजेटमध्ये Vivo Y01A ची एंट्री; कमी किंमतीत करेल का realme-redmi ची सुट्टी?

फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड व डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे, जो डिस्प्लेवरील पंच होलमध्ये मिळतो. डिवाइसमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात एक नियर-स्टॉक Android 12 अनुभव मिळतो. फोन IP52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टंस्टसह बाजारात आला आहे. तसेच, डिवाइसच्या कडेला एक फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. स्टीरियो ऑडियो डिलिव्हरीसाठी फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस-सर्टिफिकेशन असलेले स्पीकर आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here