Motorola सध्या भारतीय बाजारात जास्त सक्रिय झाल्याचं दिसत आहे. कंपनी लवकरच भारतात जगातील सर्वात पहिला 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे. तर काही दिवसांपूर्वी मोटोरोलाचा बजेट फोन Moto E22 देखील काही सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला होता, त्यामुळे लवकरच हा फोन बाजारात येणार आहे. तर आज 91मोबाइल्सला या फोनचे एक्सक्लूसिव्ह प्रेेस रेंडर मिळाले आहेत, ज्यामुळे तुम्हाला फोनच्या डिजाइन आणि कलरची माहिती मिळेल.
91मोबाइल्सलाला ही माहिती भारतातील प्रमुख टिप्सर सुधांशु अंभोरनं दिली आहे. आम्हाला ज्या रेंडर इमेज मिळाल्या आहेत त्यात तुम्ही पाहू शकता की हा फोन डार्क ग्रे कलरचा आहे जो बॉक्स डिजाइनमध्ये सादर केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि ज्यात फ्लॅश आणि AI कॅमेऱ्याची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा: OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली
फोनच्या फ्रंटला वॉटर ड्रॉप नॉच असलेली आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे तर दुसरीकडे SIM कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. सर्वात खास बाब म्हणजे या बजेट फोनमध्ये मागील पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत नाही, त्यामुळे फोनच्या पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याची शक्यता आहे. फोनच्या वरच्या पॅनलमध्ये 3.5 mm ऑडियो जॅक आहे जिथे स्पष्ट अक्षरात Dolby Atmos असं लिहलेलं दिसत आहे. त्यामुळे आशा आहे की बजेट सेगमेंटमध्ये देखील डॉल्बी इंटीग्रेशन मिळेल.
Moto E22 चे स्पेसिफिकेशन
Moto E22 च्या स्पेसिफिकेशनची सध्यातरी जास्त माहिती समोर आली नाही. अलीकडेच हा फोन NBTC, EEC, आणि Wi-Fi Alliance सारख्या सर्टिफिकेशन साइट्सवर लिस्ट झाला होता. इथून बरीचशी माहिती उपलब्ध झाली आहे. NBTC वर मिळालेल्या माहितीनुसार हा फोन GSM, WCDMA आणि LTE नेटवर्कला सपोर्ट करतो. अर्थात यात 2G, 3G आणि 4G नेटवर्क सपोर्ट देखील असेल परंतु 5G मिळणार नाही. Wi-Fi Alliance सर्टिफिकेशननुसार फोनमध्ये तुम्हाला Android 12 सपोर्ट मिळेल. सध्यातरी यापेक्षा जास्त माहिती मिळाली नाही.
परंतु अलीकडे कंपनीनं Moto E22s युरोपमध्ये लाँच केला आहे ज्यात 6.5 इंचाचा 90hz रिफ्रेश रेट असलेली HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 16MP चा ड्युअल कॅमेरा आणि 5,000 mAh ची बॅटरी आहे. हा फोन MediaTek Helio G37 चिपसेटवर चालतो आणि नवीन फोनमध्ये देखील काहीसे असेच स्पेसीफाकेशन्स आणि फीचर्स बजेट सेगमेंटमध्ये दिले जाऊ शकतात. हे देखील वाचा: लकी नंबर, जन्मतारीख असलेला मोबाइल नंबर मिळवा फ्री; घरपोच Free VIP Mobile Number असलेलं सिम
भारतात येतोय Motorola चा 200 MP कॅमेरा फोन
काही दिवसांपूर्वी Motorola नं माहिती दिली आहे की कंपनी लवकरच Motorola Edge 30 Ultra भारतात लाँच केला आहे. हा जगातील पहिला फोन आहे ज्यात 200 MP चा कॅमेरा आहे. तसेच कंपनी Motorola Edge 30 Fusion देखील सादर करणार आहे. हे दोन्ही कंपनीचे फ्लॅगशिप फोन आहेत जे खूप शानदार स्पेसिफिकेशनसह लाँच होणार आहेत.
